
कोल्हापूरमध्ये एक वेगळीच घटना सध्या समोर आलेली असून बिर्याणी विकत असलेल्या एका हॉटेलमध्ये औरंगजेब याचा फोटो लावला असा आरोप करत याच्या निषेधार्थ काही जणांनी हॉटेलमध्ये तोडफोड केली मात्र तोडफोड झाल्यानंतर हा फोटो औरंगजेब याचा नसून बहादुर शहा जफर यांचा असल्याचे समोर आले आहे.
राजारामपुरी येथील सातव्या गल्लीतील ‘ बिर्याणी बाय किलो ‘ या हॉटेलमध्ये बुधवारी रात्री उशिरा हा प्रकार घडलेला असून बुधवारी रात्री हे तरुण हॉटेलमध्ये गेले होते त्यावेळी त्यांनी हॉटेल चालकाकडे या फोटोबद्दल चौकशी केली मात्र त्याला देखील त्या संदर्भात व्यवस्थित माहिती देता आली नाही. सदर फोटो हा औरंगजेबाचा असल्याचे सांगत या तरुणांनी तोडफोड केली मात्र प्रत्यक्षात हा फोटो औरंगजेबाचे विसावे वंशज असलेला असलेले बहादुर शहा जफर यांचा होता.
बहादुर शहा जफर हे भारतातील मुघल साम्राज्याचे विसावे आणि शेवटचे बादशाह होते. अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य युद्धात त्यांनी इंग्रजांच्या विरोधात भूमिका घेतली म्हणून ब्रिटिशांनी त्यांना रंगून कैद करून ठेवले होते आणि कैदेतच त्यांचा मृत्यू झाला मात्र ते इंग्रजांसमोर झुकले नाहीत. त्यांचा दफनविधी देखील रंगून इथेच पार पडला होता.कोल्हापूरसारख्या सुसंस्कृत शहरातील तरुणांना औरंगजेब आणि बहादुर शहा जफर यांच्यातला फरक समजून न आल्यामुळे या तरुणाच्या विरोधात सोशल मीडियावर टीकेची झोड उठलेली आहे .