कडक सॅल्यूट..सीमा ढाका यांनी केली अशी कामगिरी की..

शेअर करा

पोलीस व्यक्तींनी आपल्या हातात असलेल्या शक्तीचा योग्य वापर केल्यानंतर माणूस काय करू शकतो हे आदर्शवत ठरवण्या इतपत कामगिरी एका दिल्ली येथील महिला पोलिस कॉन्स्टेबल यांनी केले असून फक्त 42 दिवसात त्यांनी तब्बल एकवीस हरवलेल्या मुलांना शोधून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे . अवघ्या 42 दिवसात यांनी ही कामगिरी केल्यामुळे त्यांचे कौतुक केले जात असून सीमा ढाका असे या महिला कॉन्स्टेबलचे नाव आहे.

सीमा यांनी हरवलेल्या मुलांना शोधून त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यासाठी देण्याचे आव्हान स्वीकारले होते त्यामुळे तब्बल दीड महिने त्यांनी दिल्ली आणि इतर राज्यात बेपत्ता झालेल्या तब्बल 21 मुलांना शोधून काढले. वेगवेगळ्या ठिकाणी फिरत त्यांनी बसस्थानक, रेल्वेस्थानक आणि मेट्रो स्टेशन येथे चौकशी करून तसेच आपल्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथे छापे टाकत मंदिर आणि मशिदीत देखील हरवलेल्या मुलांचा शोध घेतला आणि त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.

जनकपुरी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी देखील सीमा ढाका यांचे कौतुक केले असून हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी सीमा यांनी अहोरात्र परिश्रम केले. त्यांनी केलेले सूक्ष्म नियोजन आणि प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन केलेल्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले असे म्हटलेले आहे. सध्याच्या परिस्थितीत देखील सीमा अपहरणाशी संबंधित गुन्ह्यांचा तपास करत असून त्यांची ही कारवाई पुढेदेखील सुरु राहणार आहे.


शेअर करा