कर्जामुळं आत्महत्या ?, तपासात ‘ वेगळीच ‘ भानगड आली समोर

शेअर करा

देशात एक खळबळजनक असे प्रकरण उत्तर प्रदेशात समोर आलेले असून पत्नीच्या अनैतिक संबंधाची माहिती पतिला समजल्यानंतर पतीने पत्नीला मारहाण केली मात्र अखेर हतबल झालेल्या या पतीने रात्रीच्या सुमारास स्वत:वर झाडून आत्महत्या केली अशी माहिती पत्नीने पोलिसांना दिली होती मात्र ही घटना ही घटना आत्महत्या नसून अखेर पत्नीने त्याचा खून केल्याचे समोर आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, कपिल चौधरी असे मयत व्यक्तीचे नाव असून त्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात दाखल होत त्यांनी आत्महत्या केलेली आहे अशी माहिती दिलेली होती. पोलिसांनी सखोल तपासाला सुरुवात केली त्यावेळी कपिल यांच्या पत्नीचा विवाह संबंधाचा अँगल समोर आला आणि प्रेमप्रकरणात अडसर ठरत असल्या कारणाने त्यांच्या पत्नीने प्रियकराला सोबत घेऊन प्रियकराने त्यांच्यावर गोळी झाडली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला असे समोर आलेले आहे.

कपिल चौधरी हा मूळचा मेरठ मधील रहिवासी असून त्याच्यावर कर्ज होते म्हणून त्यांनी आत्महत्या केली असाही बनाव पत्नीने निर्माण केलेला होता. बंदुकीचा आवाज ऐकून आपले डोळे उघडले म्हणून आपण धाव घेतली ज्यावेळी आपला नवरा रक्ताच्या थारोळात पडलेला होता आणि त्याच्याजवळ एक पिस्तूल देखील पडलेले होते असे पत्नीने सांगितले मात्र तिचे बोलणे पोलिसांना संशयास्पद वाटले म्हणून पोलिसांचा पत्नीवर संशय सुरू झाला.

पत्नी शिवानी हिला ताब्यात घेतल्यानंतर तिने पोलिसांची दिशाभूल करायला सुरू केले मात्र पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर तिने प्रियकरांच्या मदतीने हा प्रकार केल्याचे सांगितलेले आहे. पती कपिल चौधरी याने दोन दिवसांपूर्वी आपल्याला मारहाण केलेली होती. आपले अंकुश प्रजापती नावाच्या मोबाईल दुरुस्ती करणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते म्हणून आपण त्याला मदतीला घेत दोन मार्च रोजी त्याच्या जेवणात अमली पदार्थ टाकले आणि तो नशेत असताना त्याची हत्या केली असे सांगितलेले आहे .


शेअर करा