कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण ? , काँग्रेसकडून अखेर शिक्कामोर्तब

शेअर करा

अत्यंत चुरशीच्या आणि देशभराचे लक्ष लागून राहिलेल्या निवड कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसच्या अंतर्गत मतपेटीत मुख्यमंत्रीपदाची पसंती जाणून घेण्यात आली आणि त्यानंतर अखेर सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपद देण्यात येणार आहे सोबतच काँग्रेसचे संकट मोचक म्हणून ओळख असलेले डिके शिवकुमार हे उपमुख्यमंत्री होणार आहेत.काँग्रेसकडून याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे.

काँग्रेसने जो काही फॉर्म्युला तयार केलेला आहे त्यामध्ये डी के शिवकुमार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षाचे पद देखील राहणार असून उपमुख्यमंत्रीपदाची देखील जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आलेली आहे . काँग्रेसच्या आमदारांनी केलेल्या मतदानात तब्बल 80 टक्के आमदारांनी सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाला पसंती दाखवली होती त्यावरून अखेर सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री पद बहाल करण्यात येणार आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि संघटन सरचिटणीस केसी वेणूगोपाल यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची मंगळवारी भेट घेतली त्यावेळी कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून चर्चा करण्यात आली आणि अखेर सिद्धरामय्या यांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे. ज्यांच्याकडे आमदारांचे अधिक समर्थन आहे त्यांनाच मुख्यमंत्रीपद देण्यात यावे अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतली होती . राहुल गांधी यांचे दोन्हीही नेते निकटवर्तीय असून काँग्रेसमध्ये अंतर्गत कुठलाही वाद नाही मात्र गोदी मीडियाकडून वाद निर्माण करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत तर काँग्रेसच्या आनंद सोहळ्याची ऍलर्जी असल्याने पाकिस्तान युक्रेन या मुद्द्यावर जास्त प्रमाणात भर देण्यात येत आहे.


शेअर करा