कसं फसवता करून दाखवा ? पोलिसांनी करून घेतली रंगीत तालीम , पहा व्हिडीओ

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या आरोपींना पकडल्यानंतर त्यांच्याकडून कशी फसवणूक करतात याची रंगीत तालीम करून घेतलेली आहे. तब्बल अर्ध्या तासांचा हा व्हिडिओ असून त्यामध्ये आरोपी असलेल्या व्यक्ती फोन करून कसे बोलतात आणि कशा पद्धतीने समोरच्यांना फसवतात हे या व्हिडिओत दिसून येत आहे.

लखीसराई लाईव्ह या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला असून व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, पोलीस अधिकारी जणू साधारण व्यक्ती आहेत अशा स्वरूपाने त्यांना आरोपीचा फोन येतो. फोन आल्यानंतर ते त्याला कशासाठी फोन केला आहे वगैरे माहिती विचारतात त्यावेळी समोरील आरोपी त्यांना एक एक कारण देतो आणि त्यानंतर ज्या पद्धतीने फसवणूक करतो त्याचा हा व्हिडिओ आहे. फसवणुकीचा हा व्हिडिओ बनवून सोशल मीडियात शेअर करण्यात आलेला आहे. तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आरोपींचे फसवणुकीचे कौशल्य अद्भुत आहे.

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की फसवणूक करणारे आरोपी हे जास्त काही शिकलेले नाहीत मात्र बोलण्यात एक्सपर्ट असल्याने ते सुशिक्षित असलेल्या व्यक्तींना देखील पद्धतशीरपणे गंडा घालताना दिसून येत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.


शेअर करा