काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक..आता चक्क माजी मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये दाखल , इतरही तब्बल..

शेअर करा

कर्नाटकची सत्ता भाजपला गमवावी लागणार असल्याचे दिसत असून भाजपच्या गोटात यामुळे एकच खळबळ उडालेली आहे. आता चक्क माजी मुख्यमंत्री असलेले जगदीश शेट्टर यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. काँग्रेस कार्यालयात आल्यानंतर त्यांचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी स्वागत केलेले आहे.

जगदीश शेट्टर यावेळी म्हणाले की, ‘ पक्षाचा ज्येष्ठ नेता असल्याने मला तिकीट मिळेल असे वाटले होते मात्र तसेच झाले नाही याचा मला धक्का बसला. माझ्याशी कुणी काही बोलले नाही किंवा मला समजवण्याचा देखील प्रयत्न केला नाही.. मला कोणते पद दिले जाईल हे देखील सांगण्यात आलेले नाही.’ . विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने त्यांना उमेदवारी दाखल करण्याचा फॉर्म दिलेला आहे. जगदीश शेट्टर हे काही कालावधीसाठी चक्क भाजपचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत तसेच संघाशी त्यांची चांगली जवळीक आहे .

काँग्रेसने नेते सिद्धरामय्या यांनी यावेळी बोलताना , कर्नाटकमध्ये काँग्रेसचा दीडशेपेक्षा अधिक जागांवर विजयी होणार असून भाजपचा डोलारा हा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळणार आहे ‘, असे देखील म्हटलेले आहे. कर्नाटकमध्ये सध्या ४० पेक्षा बाहुबली काँग्रेसमध्ये दाखल झालेले असून भाजपचे गुजरात मॉडेल कर्नाटक फेल झालेले दिसून येत आहे .


शेअर करा