
मध्यप्रदेशात सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून विरोधी पक्ष नेत्यांना टार्गेट करणे त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार सर्रासपणे सुरू झालेले असून काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी , मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि अरुण यादव या वरिष्ठ नेत्यांच्या ट्विटर हँडलच्या विरोधात मध्यप्रदेशात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. प्रियंका गांधी यांनी एक बातमी शेअर करून मध्यप्रदेशमधील कंत्राटदारांकडून 50 टक्के कमिशन मागितल्याचा दावा केलेला होता त्यानंतर मध्यप्रदेश सरकार भ्रष्टाचारात अडकलेली आहे असा आरोप केल्यानंतर पुढील तपासाची दिशा ठरवण्यासाठी चक्क ट्विटरकडून उत्तर मागवण्यात आलेले आहे.
भाजपचे स्थानिक नेते निमेश पाठक यांनी प्रियंका गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात तक्रार दिलेली असून ज्ञानेंद्र अवस्थी नावाच्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर एक पत्र सार्वजनिक केलेले होते त्यामध्ये कंत्राटदाराकडून 50 टक्के कमिशन मागितल्याचा दावा करण्यात आलेला होता आणि त्याचे हे पत्र प्रियंका गांधी , कमलनाथ आणि अरुण यादव यांनी शेअर केल्यानंतर संयोगितागंज पोलीस ठाण्यात फसवणूक प्रतिष्ठेला ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न करणे या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते संतोष सिंह गौतम यांनी मध्यप्रदेशातील भाजप सरकार 50% कमिशन खोरीच्या खुलासामुळे चवताळलेली आहे त्यामुळे आमच्या नेत्यांच्या ट्विटर हँडलवर गुन्हा दाखल करण्याचा प्रकार त्यांनी केलेला आहे मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचे सरकार बनणार आहे असे देखील त्यांनी म्हटलेले आहे.