कांदा नाही तर शेतकरीच कोसळलाय , पहा व्हिडीओ

शेअर करा

कांद्याचे भाव सध्या प्रचंड कोसळलेले पाहायला मिळत असून शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. कांदा महाग झाल्यानंतर महागाईचा डांगोरा पिटणारा मीडिया कांद्याचे भाव कमी झाल्यानंतर मात्र शांत पडलेला दिसून येत आहे. भाव नसल्यामुळे कांद्यावर ट्रॅक्टर , जेसीबी फिरवल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालेले आहेत या पार्श्वभूमीवर एका शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

नाशिक जिल्ह्यातील हा व्हिडिओ असून या शेतकऱ्याला 25 क्विंटल कांद्याचे अवघे 152 रुपये मिळालेले असून त्याचा हा व्हिडिओ आहे. शेतकऱ्याच्या कांद्याला प्रति किलो फक्त 16 पैसे इतका दर मिळालेला असून स्वतःच्या खिशातून गाडी भाड्यासाठी पैसे द्यावे लागलेले आहेत . सदर व्हिडिओमध्ये शेतकरी रडताना दिसून येत आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसलेला असून शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च सुद्धा निघत नसल्याची परिस्थिती आहे. राज्यातील सत्ता संघर्ष याच्यातच इलेक्ट्रॉनिक माध्यमे नागरिकांना व्यस्त ठेवत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीकडे लक्ष देण्यासाठी माध्यमांना वेळ राहिलेला नाही. किरकोळ स्वरूपाच्या दोन-तीन बातम्या देऊन पुन्हा एकदा सत्ता संघर्षाच्या नशेत नागरिकांना भूलवण्याचे प्रकार महाराष्ट्रात सुरू आहेत.


शेअर करा