काचेच्या ग्लासात फटाका फोडण्याचा प्रयत्न अंगलट , एकाचा मृत्यू

शेअर करा

दिवाळीत अनेक नागरिकांनी फटाके रॉकेट वाजवत दिवाळी साजरी केली मात्र उत्तर प्रदेशातील बदायू इथे जरीफ नगर परिसरात एका व्यक्तीला काचेच्या ग्लासमध्ये ठेवून फटाका फोडण्याचा प्रकार अंगलट आला असून एका नागरिकाला त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. फटाक्याचा मोठा आवाज व्हावा म्हणून त्याने चक्क काचेच्या बाटलीत फटाका ठेवला होता आणि त्यानंतर फटाका पेटवल्यानंतर काचेच्या ग्लासचे तुकडे झाले आणि त्याचा एक तुकडा नागरिकाच्या गळ्यात घुसला त्यात तो गंभीर जखमी झाला. दिवाळीच्या दिवशीच हा प्रकार समोर आला असून सदर प्रकार घडल्यानंतर या व्यक्तीला दवाखान्यात दाखल करण्यात आले होते मात्र त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार झालेला आहे.

बदायू जिल्ह्यातील जरीफ नगर परिसरातील पोलिस ठाण्याच्या मोरूबाला गावात हे प्रकरण घडलेले असून धीरेंद्र असे आरोपीचे नाव असल्याचे समजते. धीरेंद्र याने काचेच्या ग्लासात फटाका फोडला त्यावेळी तेथून 36 वर्षीय छत्रपाल नावाचे नागरिक जात असताना हात काचेचा तुकडा त्यांच्या घशाला लागला. हा प्रकार दिसतात धीरेंद्र हा तिथून फरार झाला. नागरिकांनी छत्रपाल यांना रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही म्हणून त्यांना अलिगड वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यासाठी जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.


शेअर करा