काळ आला होता पण ‘ गाढवबेल्ट ‘ मध्ये आला , काळजाचे ठोके चुकवणारा व्हिडीओ

शेअर करा

सोशल मीडियावर कधी काय होईल याचा नेम राहिलेला नाही अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेली असून ज्या पद्धतीने घोडागाडी आहे तशाच पद्धतीने एका व्यक्तीने गाढव गाडी बनवली आणि गाढवाला देखील लगाम लावला होता मात्र गर्दी पाहिल्यानंतर गाढवाची चांगलीच भंबेरी उडाली आणि त्याने जोरात पळायला सुरू केले.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये या गाढवाला गाडीची जोरदार धडक बसते त्यावेळी गाडीच्या पुढे असलेला गाढव हवेत उडतो मात्र तो पुन्हा जमिनीवर पडून स्वतःचा तोल सांभाळण्याचा प्रयत्न करतो याच वेळी गाढव गाडीत बसलेल्या या व्यक्तीने त्याचा गाढवाचा दोर हा घट्ट पकडलेला असतो त्यामुळे तो उलटा पडत नाही तर तो देखील गाढवासोबत सावरून बसतो. गाढवामुळेच या व्यक्तीचे प्राण वाचल्याचे देखील चर्चा सोशल मीडियावर सुरू झालेली असून या मालकाने गाढवाचे आभार व्यक्त करायला हवेत अशा देखिल प्रतिक्रिया त्याला येत आहेत .

सदर घटना कुठली आहे हे अद्यापपर्यंत समोर आलेले नसून एका ट्विटर युजरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. गाढवाच्या सीटबेल्टमुळे तो वाचला नाहीतर कारने त्याला मारलं असतं या व्हिडिओला देण्यात आलेले आहे. सदर व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या प्रतिक्रिया देत असून मालकाच्या प्रकृतीबद्दल देखील काहीजण आपुलकीने चौकशी करत आहेत.


शेअर करा