‘ काहीतरी वेगळं ‘ , गुजरातच्या नवरदेवाचा अनोखा प्रयोग

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका नवरदेवाची जोरदार चर्चा सुरू त्याच्या लग्नात काढलेल्या आगळ्यावेगळ्या मिरवणुकीमुळे ही चर्चा सुरू आहे. त्याने त्याच्या लग्नाची मिरवणूक ही घोड्यावर किंवा चार चाकी वाहनातून नव्हे तर चक्क जेसीबीवर बसून काढलेली आहे. गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात ही घटना समोर आलेली असून नवरदेव मोठ्या थाटात जेसीबीवर बसून लग्नस्थळी पोहोचलेला होता.

केयूर पटेल असे या नवरदेवाचे नाव असून काहीतरी वेगळं करायचं म्हणून तो जेसीबीवर बसून तिथे आला आणि आदिवासी परंपरेनुसार त्याचा विवाह पार पाडण्यात आला. लग्नासाठी म्हणून त्याने हा जेसीबी स्पेशल सजवून घेतलेला होता. जेसीबीच्या बॉक्सला फुलांचे तोरण देखील त्याने बांधलेले होते आणि बसायला देखील तिथे सोफा ठेवलेला होता. परिसरात त्याच्या या अनोख्या प्रयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे.


शेअर करा