कुणाचं मरण कुठं ? , कोंबडा आत्मविश्वासानं बाहेर पण मालक दगावला

शेअर करा

कुणाचे मरण कुठे लिहिलेलं आहे हे कोणीही ठरवू शकत नाही या वाक्याची प्रचिती येणारी एक घटना गडचिरोली जिल्ह्यात समोर आलेली असून एक वृद्ध इसम एका कोंबड्याचा जीव वाचवण्यासाठी विहिरीत उतरला मात्र त्यात त्याचा मृत्यू झाला आणि विहिरीत पडलेला कोंबडा सुखरूप बाहेर आला.

उपलब्ध माहितीनुसार, सोनू करू पुंगाटी ( वय 70 ) असे मयत झालेल्या वृद्ध इसमाचे नाव असून ते इंदिरा वार्डातील रहिवासी आहेत. पोस्टातून रिटायर झाल्यानंतर त्यांनी घरी काही कोंबड्या पाळलेल्या होत्या त्यातील एक कोंबडा घराजवळील विहिरीत पडला. त्याला वाचवण्याच्या उद्देशाने ते देखील विहिरीत उतरले आणि कोंबड्याला पकडून त्यांनी विहिरीबाहेर फेकले मात्र या दरम्यान त्यांचा तोल गेला आणि ते विहिरीत पडले त्यात त्यांचा मृत्यू झाला.


शेअर करा