कुरुलकर प्रकरणावर सत्ताधारी गप्प का ? अजित पवार यांनी खडसावलं

शेअर करा

पुणे येथील डीआरडीओ चा ज्येष्ठ शास्त्रज्ञ असलेला प्रदीप कुरुलकर याने देशद्रोही कृत्य केलेले असून त्याचे प्रकरण सध्या फास्टट्रॅकवर चालवा . त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. देशाशी गद्दारी करणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही स्वरूपात माफ केले जाणार नाही असा संदेश यातून जनतेत जायला हवा , अशी भूमिका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी घेतलेली आहे. अंगाशी प्रकरण आल्यानंतर काही लोक जाणीवपूर्वक गप्प बसतात असा टोला देखील त्यांनी भाजपला मारलेला आहे. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार पुण्यात आलेले होते त्यावेळी पत्रकारांनी कुरुलकर प्रकरणात सत्ताधारी काही बोलत नाहीत याकडे लक्ष वेधले तेव्हा त्यांनी वरील प्रतिक्रिया दिलेली आहे.

अजित पवार म्हणाले की ,’ कुरुलकर यांनी जे काही केले तो देशद्रोह आहे. त्या संदर्भातचे सर्व पुरावे समोर आलेले आहेत. माझे वैयक्तिक मत विचारले तर कुरुलकर यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक जेव्हा समीर वानखेडे यांच्याबद्दल बोलत होते तेव्हा कित्येक लोक समीर वानखेडे यांची बाजू घेत होते. जे नबाब मलिक बोलत होते तेच आज सीबीआय करत आहे. त्यावेळी समर्थन करणारे आता कुठे गेले . राजकारण करणाऱ्यांनी राजकारण करावं परंतु जाणीवपूर्वक एखाद्याला पुरावा नसताना लक्ष करू नये ‘, असे देखील ते पुढे म्हणाले.


शेअर करा