कॅनडाकुमार हा आमचा भारत लाज वाटू दे

शेअर करा

चित्रपट अभिनेता अक्षय कुमार याने गेल्या काही वर्षांपूर्वी भारतात टॅक्स जास्त भरावा लागतो असे कारण दाखवत कॅनडाचे राष्ट्रीयत्व स्वीकारले आहे. विरोधाभास असा की अक्षय कुमार राष्ट्रवादाच्या नावावर अनेक चित्रपट काढत स्वतःची तिजोरी भरतो मात्र प्रत्यक्षात तो कॅनडाचा रहिवासी नागरिक झालेला आहे. आपल्या चित्रपटाचे प्रमोशन आणि जाहिरातीचे प्रमोशन यामध्ये तो सतत बिझी असतो मात्र अक्षय कुमार सध्या त्याच्या नवीन जाहिरातीमुळे चांगलाच वादात सापडलेला पाहायला मिळत आहे.

त्याने आपल्या ट्विटर हँडलवर नॉर्थ अमेरिका टूर यासाठी एक व्हिडिओ शेअर केलेला असून त्यामध्ये संपूर्ण पृथ्वीचा गोल असलेल्या जागतिक नकाशावर तो चालताना दिसून येत आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री मोनी राय, दिशा पटनी, सोनम बाजवा आणि नोरा फतेही देखील आहे. सर्व स्टार एका ॲनिमेटेड पृथ्वीवरून चालताना दिसत असून अक्षय कुमार चक्क भारताच्या नकाशावर पाय ठेवताना दिसून येत आहे त्यावरून सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार निशाणा साधला जात आहे.

प्रमोशनसाठी म्हणून अक्षय कुमारने केलेला हा व्हिडिओ त्याच्या चांगलाच अंगलट आलेला असून अनेक जणांनी त्याच्यासाठी भाषेची मर्यादा ओलांडत त्याला चांगलेच ट्रोल केलेले आहे. ‘ हा आमचा भारत आहे तुझा कॅनडा नाही. लाज वाटू दे. भारताला देखील तू सोडलेले नाही कॅनडा कुमार ‘ असे म्हणत त्याच्यावर जोरदार निशाणा साधला जात आहे. पंतप्रधान मोदी यांची मुलाखत घेतल्यानंतर अक्षयकुमार अनेक जणांच्या निशाणावर असून मोदी यांच्या मुलाखतीत त्याने आंबे कसे खातात असे प्रश्न विचारत स्वतःची खिल्ली उडवून घेतली होती तसेच पंतप्रधान यांना देशाबद्दलचे प्रश्न न विचारता आंबे कसे खाता असे फालतू प्रश्न विचारल्याने त्याचे त्यावेळी चांगलेच हसे झालेले होते.


शेअर करा