
सोशल मीडियावर सध्या एका कोंबडीची जोरदार चर्चा सुरू ही कोंबडी देशातील उत्तराखंड येथील आहे. कोंबडीने असा काही कारनामा केला आहे की ते ऐकून पशुसंवर्धन विभाग देखील बुचकळ्यात पडलेला आहे. सदर कोंबडीने एकाच दिवसात तब्बल 31 अंडी दिलेली असून हा प्रकार उत्तराखंडमधील बासोट येथील आहे तर मागील दहा दिवसात तिने 52 अंडी घातलेली असल्याचा दावा तिच्या मालकाने केलेला आहे.
कोंबडीचे मालक गिरीशचंद्र बुधानी यांनी याप्रकरणी माहिती दिलेली असून ते एका टूर्स आणि ट्रॅव्हल्स मध्ये काम करतात. अंडी खाण्यासाठी म्हणून त्यांनी दोन कोंबड्या पाळलेल्या असून यासंदर्भात त्यांनी एका यूट्यूब चैनलला मुलाखत दिली त्यामध्ये या व्हिडिओमध्ये एका कोंबडीने तब्बल 31 अंडी दिल्याचा देखील त्यांनी दावा केलेला आहे. बातमी व्हायरल झाल्यानंतर पशुसंवर्धन विभाग देखील ही अनोखी कोंबडी पाहण्यासाठी दाखल झालेला असून त्यांनी या कोंबडीचा अभ्यास सुरु केला आहे.
गिरीशचंद्र बुधानी यांनी युट्युब चॅनेलसोबत बोलताना म्हटले की मुलांच्या सांगण्यावरून मी सुरुवातीला दोन कोंबड्या घरी पाळलेल्या होत्या. खरे तर कोंबडी दिवसाला जास्तीत जास्त एक किंवा जास्तीत जास्त दोन अंडी देते पण रविवारी माझ्या कोंबडीने एकानंतर एक अशी एकतीस अंडी दिलेली आहे. बारा तासात 31 अंडी दिलेली कोंबडी सुव्यवस्थित असून मागच्या दहा दिवसात तिने एकूण 52 अंडी दिलेली आहे.