कोपर्डीत चिमुरडा सागर वाचला असता पण पाच फूट बाकी असतानाच..

शेअर करा

अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे १५ फुटी बोअरवेलमध्ये पडलेल्या ५ वर्षीय चिमुकल्याचा अखेर मृत्यू झाला असून काळ संध्याकाळी सातच्या दरम्यान तो बोअरसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडलेला होता. त्याला वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाने तब्बल ८ तास बचावकार्य केले मात्र अखेर त्याला वाचवण्यात यश आले नाही. बोअरचा खड्डा खुला ठेवणाऱ्या लोकांवर कारवाईची मागणी ग्रामस्थ करत असून याआधी देखील देशात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, सागर बारेला असं मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचं नाव असून तो आणि त्यांचे कुटुंबीय महाराष्ट्रात पोटाची खळगी भरण्यासाठी मध्यप्रदेशातून आलेले होते. कर्जत तालुक्यात अखेर त्यांना ऊस तोडीच काम मिळाल व ते शेतात एका झोपडीत राहत होते तेथील शेतात असलेल्या एका बोअरवेल मध्ये बारेला कुटुंबातील ५ वर्षीय सागर बरेला हा खेळताना पडला अन त्यात त्याचा मृत्यू झाला.

सोमवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास तो दिसून येत नसल्याने त्याचा शोध घेण्यात आला आणि अखेर तो बोअरवेलमध्ये पडल्याचे दिसले. कर्जत येथील प्रशासनाने एनडीआरएफ टीम दाखल होईपर्यंत ऑक्सिजनच्या नळ्या बोअरवेल मध्ये सोडल्या होत्या आणि एनडीआरएफ टीम आल्यावर त्यांनी काम सुरु केले मात्र अचानक दहा फुटावर एक दगड लागला आणि सागरला बाहेर काढण्यासाठी त्यामुळे तब्बल ८ तासांचा कालावधी गेला मात्र अखेर त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे .


शेअर करा