कौतुकास्पद..पोलीस पत्नीने स्वतः दूध पाजून वाचवला बाळाचा जीव

शेअर करा

बाळाचा जीव

सोशल मीडियावर सध्या एका पोलीस जोडप्याची जोरदार चर्चा सुरू असून उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील हे दांपत्य आहे..विनोद सिंह असे या पोलीस पतीचे नाव असून एका जन्मदात्या आई वडिलांनी त्यांच्या बाळाला थंडीत सोडून पलायन केले होते त्यानंतर विनोद सिंह यांच्या पत्नीने या बाळाचा जीव वाचवण्यासाठी त्याला स्वतःचे दूध पाजून जीवनदान दिले आहे . सदर पोलीस दांपत्याचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक केले जात आहे.

काही दिवसांपूर्वी नॉलेज पार्क परिसरात एका झुडुपामध्ये नवजात अर्भक आढळून आले होते. त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले त्यावेळी त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती थंडीमुळे ते गारठून गेले होते आणि त्याच्या पोटातही अन्नाचा कणही नव्हता. विनोद सिंह यांना या प्रकाराची माहिती समजताच त्यांनी सदर बाब ही पत्नीच्या कानावर घातली आणि त्यानंतर त्यांच्या पत्नीने या बाळाला स्वतःचे दूध पाजून जीवनदान दिले.

बाळाला थंडीत सोडून पलायन करणाऱ्या आई-वडिलांचा पोलीस शोध घेत असून बाळाचा अर्भकाचा जीव वाचवणाऱ्या पोलीस पत्नी ज्योती यांनी माध्यमांशी बोलताना, ‘ त्याचे शरीर थंड पडलेले होते. त्याच्या पोटात अन्नाचा कण नव्हता त्यामुळे ऊब देण्यासाठी तिला ब्लँकेटमध्ये गुंडाळून जवळ ठेवले आणि त्यानंतर बाळ भुकेले असल्याने स्वतः बाळाला दूध पाजले. कुठल्याही परिस्थितीत आपल्या बाळाचा आपण बळी देऊ नका. आपल्याला जर बाळाची काळजी घेण्यात अडचण असेल तर अनाथाश्रम किंवा स्वयंसेवी संस्थांकडे त्यांना द्या मात्र असे वर्तन करू नका, ‘ असे देखील पुढे म्हटले आहे.


शेअर करा