कौतुकास्पद..म्हणून दोन्ही बहिणींनी एकाच तरुणासोबत केले लग्न

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या दोन बहिणीची जोरदार चर्चा असून दोन्ही सख्या बहिणींनी एकाच व्यक्तीसोबत लग्न केलेले आहे. राजस्थान येथील ही घटना असून घटनेमागचे कारण देखील तितकेच वेगळे आहे. या लग्नाला दोन्ही कुटुंबीयांची देखील संमती होती आणि हे लग्न मोठ्या थाटामाटात करण्यात आलेले आहे.

राजस्थानच्या टोक जिल्ह्यातील उनिहारा मोरझाला झोपडीया गावातील ही घटना असून नवरदेव असलेला हरीओम मीना हा पदवीधर आहे. दोन बहिणींपैकी एका बहिणीने उर्दूमध्ये एमए केलेले आहे तर लहान बहिण आठवीपर्यंत शिकलेली आहे . लग्न जमले त्यावेळी हरीओम याच्या वडिलांनी मोठी मुलगी कांता तिच्यासाठी मुलाला पाठवले होते मात्र त्यानंतर कांताने जी अट घातली ती देखील तितकीच वेगळी होती.

जर माझ्याशी लग्न करण्याची इच्छा असेल तर माझ्या लहान बहिणीसोबत देखील हरिओम यांनी लग्न करावे अशी अजब अट कांता यांनी घातलेली होती त्यानंतर कांता आणि सुमन या दोन्ही बहिणींचे पाच मे रोजी हरिओम यांच्या सोबत लग्न झालेले आहे. सुमन ही मानसिकदृष्ट्या कमजोर आहे त्यामुळे तिची काळजी कोण घेणार नाही हे लक्षात आल्यानंतर ती आपल्यासोबत राहिली तर आपण तिची काळजी घेऊ अशी कांता तिची इच्छा होती त्यानंतर तिने होणाऱ्या पतीसोबत याविषयी बोलणी केली आणि अखेर दोन्ही बहिणी एकाच घरात नांदण्यासाठी गेलेल्या आहेत.


शेअर करा