‘ क्रिप्टोकरन्सी ‘ भुलभुलैय्या नगरमध्ये , तोफखान्यात गुन्हा दाखल

शेअर करा

नगर येथे एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमध्ये कमिशन मिळाल्याचे दाखवून कमिशन कोटी पैसे मागून घेतल्यानंतर एका व्यक्तीची दोन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तक्रारदार व्यक्ती यांना तब्बल 12 लाख रुपयांचा नफा झाला असल्याचे आरोपीने दाखवलेले होते.

उपलब्ध माहितीनुसार, अमित प्रकाश भंडारी ( राहणार अवधूत गृहनिर्माण सोसायटी निर्मलनगर ) असे तक्रारदार व्यक्ती यांचे नाव असून याप्रकरणी एका व्हाट्सअप ॲडमिनच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. फिर्यादी यांना एका ग्रुपमध्ये आरोपींनी सामील करून घेतलेले होते त्यामध्ये क्रिप्टो करन्सीमध्ये खूप फायदा झालेला आहे असे दाखवत त्यांना एडमिन यांनी आपल्या जाळ्यात ओढलेले होते.

तक्रारदार व्यक्ती यांनी अधिक चौकशी केली त्यानंतर प्लेस्टोर मधून एक ॲप डाऊनलोड करण्यात आले त्यामध्ये सुरुवातीला त्यांनी दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली त्यावर बारा लाख रुपयांचा नफा झालेला आहे असा देखील त्यांना मेसेज आला मात्र हे पैसे काढण्यासाठी तुम्हाला कमिशन म्हणून आधी तीन लाख 46 हजार रुपये भरावे लागतील असे देखील सांगितले होते. ही रक्कम देखील तक्रारदार व्यक्ती यांनी पाठवली मात्र त्यानंतरही पैसे आले नाहीत आणि अखेर हे ॲप प्ले स्टोअरमधून काढून टाकण्यात आले असे त्यांनी म्हटलेले आहे.


शेअर करा