
क्रूरतेच्या मर्यादा पार करणारी एक घटना हैदराबाद इथे समोर आलेली असून एका व्यक्तीने आपल्यासोबत राहत असलेल्या लिव्ह इन पार्टनर महिलेची हत्या करून दगड कापण्याच्या मशीनने तिचे तुकडे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. आरोपीने आधी महिलेचे डोके कापले त्यानंतर हातपाय कापून वेगवेगळे तुकडे करत वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिलेले होते. 17 मे रोजी या महिलेचे शिर एका कचऱ्यात आढळून आलेले होते मात्र आता आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , 17 मे रोजी हैदराबाद मधील ठियागलगुडा रोडवरील एका कचऱ्याच्या डब्यात एका महिलेचे मुंडके प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेले आढळून आलेले होते त्यानंतर महिलेची ओळख पटवण्यात आली त्यावेळी तिचे नाव अनुराधा रेड्डी असे असल्याचे समोर आले. पोलिसांनी अवघ्या ४४ तासात या प्रकरणातील आरोपी बी चंद्रमोहन याला अटक केलेली आहे.
चंद्रमोहन याने अनुराधा रेड्डी नावाच्या 55 वर्षीय महिलेचा खून केलेला होता त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावली. आरोपीने महिलेच्या शरीरातील काही भाग कापून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर काही कालावधीनंतर तुकडे फेकून दिलेले होते. चंद्रमोहन हा शेअर बाजारात ऑनलाइन ट्रेडिंगचे काम करत होता. दोघेही गेल्या पंधरा वर्षांपासून एकत्र राहत होते. अनुराधा रेड्डी ही व्याजावर पैसे देत असायची त्यामुळे मोहन याने व्यवसायासाठी तिच्याकडून सात लाख रुपये घेतले आणि ते शेअर मार्केटमध्ये डुबलेले होते. अनुराधा त्याच्यावर पैशासाठी दबाव टाकत होती मात्र त्याला तिला देण्यासाठी पैसे नसल्याकारणाने आरोपीने तिलाच संपवण्याचा निर्णय घेतला.
12 मे रोजी चंद्रमोहन याने अनुराधा हिच्यासोबत भांडण केले आणि त्यानंतर तिच्यावर चाकूने हल्ला केला. तिच्या छातीवर आणि पोटावर वार करत तिची हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट लावण्यासाठी त्याने दगड कापण्याची मशीन खरेदी केली आणि या मशीनने तिच्या मृतदेहाचे तुकडे करत त्याने रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेले होते आणि टप्प्याटप्प्याने हे तुकडे त्याने फेकून दिले मात्र अखेर पोलीस त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत.