
गेल्या दोन आठवड्यापासून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे बाहुबली खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात सुरू असलेले कुस्तीपटूंचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सातत्याने केला जात आहे. एका पोलिसाने विनेश फोगाट नावाच्या एका महिला कुस्तीपटूचा विनयभंग केला असा आरोप करण्यात येत असून दिल्ली पोलिसांच्या या कृत्याचा निषेध करण्यात येत आहे .विनयभंग करणारा पोलीस हा दारूच्या नशेत धूत असल्याचा आरोप विनेश फोगाट यांनी केलेला आहे.
पंतप्रधान मोदी खेळाडूंनी पदक मिळवून आणल्यानंतर खेळाडूंसोबत फोटो काढण्यासाठी सक्रिय दिसतात मात्र आतापर्यंत या खेळाडूंच्या या आंदोलनाबद्दल त्यांनी एक शब्दही त्यांनी उच्चारला नाही तर भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी देखील दिल्ली पोलीस प्रकरणाची शहानिशा करून गुन्हा दाखल करू असे सांगत आहेत.
देशासाठी पदके मिळवणाऱ्या महिला खेळाडूंचे हे आंदोलन चिरडण्याचा केंद्राचा प्रयत्न असल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केलेला असून काँग्रेस नेते दीपेंद्र हुडा हे त्या ठिकाणी पोहोचले त्यावेळी दिल्ली पोलिसांनी त्यांना देखील ताब्यात घेतले होते. आंदोलन स्थळी पत्रकारांच्या प्रवेशावर देखील बंदी घालण्यात आलेली असून केंद्र सरकारच्या या कृत्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. दिल्ली पोलीस हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात.