
महाराष्ट्रात एक अत्यंत अशी खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून आर्थिक तंगीतुन एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा गळा चिरून खून केला आणि त्यानंतर त्याने स्वतः देखील गळा चिरुन आत्महत्या केली. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात हा प्रकार समोर आलेला असून सीतासावंगी या गावात ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सरिता सुरेश बोरकर ( वय 37 ) असे पत्नीचे नाव असून तिचा पती सुशील नीलकंठ बोरकर ( वय 45 ) याने आर्थिक तंगीतुन हा प्रकार केलेला आहे. सुशील याचा अंडी विक्री करण्याचा व्यवसाय होता तर सरिता या आशा सेविका म्हणून आरोग्य विभागात कार्यरत होत्या. गेल्या काही महिन्यांपासून कुटुंबीय आर्थिक अडचणीत सापडले होते आणि यातून बाहेर निघण्यासाठी कुठलाच मार्ग त्यांना आढळून येत नव्हता.
गुरुवारी रात्री सुशील सरिता एका खोलीत आणि त्यांची दोन्ही मुले दुसर्या खोलीत झोपली होती. शुक्रवारी सकाळी सरिता रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्यानंतर तिथेच सुशील देखील गळा चिरून घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने बाहेरील व्यक्ती आल्याची शक्यता दिसून येत नाही तसेच ज्या ब्लेडने पत्नीचा गळा आरोपीने चिरला त्याच ब्लेडने त्याने स्वतःचा देखील गळा चिरुन आत्महत्या केलेली आहे.