
सरकारी नियमाप्रमाणे जर काही शारीरिक व्यंग असेल तसेच इतर नियमावली आणि कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतरच गर्भपात करण्याची परवानगी देण्यात येते मात्र या प्रकाराचे उल्लंघन करत अनेक बेकायदा गर्भपात केंद्रे राज्यात सुरू असून अमानुषतेचा कळस या प्रकरणात गाठलेला पाहायला मिळत आहे. असेच एक प्रकरण सध्या औरंगाबाद जिल्ह्यातील चितेगाव येथे समोर आलेले असून ‘ औरंगाबाद श्री रुग्णालय ‘ येथे कित्येक महिलांचे अवैध गर्भपात करण्यात आलेले आहेत.
सदर गर्भपात केंद्र हे सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेले असून याआधी देखील औरंगाबाद, बीड आणि जालना परिसरात अशा अनेक घटना उघडकीला आलेल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकारात महिलांचा देखील सहभाग आढळून आलेला असून पोलिसांनी या केंद्रावर छापा टाकला त्यावेळी बीएचएमएस डॉक्टर हा प्रकार करत असल्याचे लक्षात आले. पुरुष असलेल्या व्यक्तींकडे डॉक्टर असल्याचे देखील कुठले प्रमाणपत्र देखील आढळून आलेले नाही.
अवैध पद्धतीने एका महिलेचा गर्भपात गेल्यानंतर तिची प्रकृती खालावली आणि त्यानंतर तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा औरंगाबाद श्री रुग्णालयातील हा कारनामा उघडकीला आला. पोलीस सोबत घेऊन आरोग्य विभागाच्या पथकाने शनिवारी रात्री चितेगाव येथे औरंगाबाद श्री रुग्णालयावर छापा टाकला त्यावेळी गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे. पीडित महिलेला आधी दोन मुली असून त्यानंतर पुन्हा तिचा गर्भपात केला गेल्या असल्याने मुलगा होण्याच्या उद्देशानेच या गर्भाचा बळी घेण्यात आला अशी शक्यता वर्तवली जात आहे.