
देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण साउथ फिल्म इंडस्ट्रीत समोर आलेले असून कन्नड टीव्ही अभिनेत्रा अभिनेता संपत जे राम नावाच्या व्यक्तीने 22 एप्रिल रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सर्व काही सुरळीत चालू असताना त्यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले याविषयी जोरदार चर्चा रंगली होती.
बंगळुरू येथील हे प्रकरण असून त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आलेला होता. गेल्या काही दिवसांपासून ते तणावाखाली होते अपेक्षेप्रमाणे चित्रपट आणि टीव्ही शो मिळाली नाहीत म्हणून ते नैराश्यात गेले असे सांगण्यात आलेले होते मात्र या प्रकरणाला नवीन ट्विस्ट आलेला असून त्यांच्या एका मित्राने यासंदर्भात खुलासा केलेला आहे.
मित्रांने माहिती दिल्याप्रमाणे संपत हे त्यांची गर्भवती असलेली पत्नी यांना घाबरवण्यासाठी फाशीचा प्रँक व्हिडिओ बनवत होते मात्र प्रँक व्हिडिओ बनवण्याच्या नादात खरोखरच त्यांना गळफास बसला आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. राजेश ध्रुव असे त्यांच्या मित्राचे नाव असून त्यांचा यासंदर्भात त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झालेला आहे.
राजेश ध्रुव यांनी म्हटले आहे की, ‘ संपत आणि त्यांच्या पत्नीमध्ये काही कारणावरून वाद झालेला होता त्यावेळी त्याने त्यांच्या पत्नीला घाबरवण्यासाठी गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला आणि याच दरम्यान चुकून त्यांना गळफास बसला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूसंदर्भात जी माहिती देण्यात येत आहे ती अफवा असून लोकांनी कुठल्याही अफवा पसरू नयेत ‘, असे देखील त्यांनी म्हटलेले आहे . संपत यांची पत्नी पाच महिन्याची गर्भवती असल्याची माहिती समोर आलेली आहे.