गावात दशक्रिया विधीचे बॅनर अन आजोबा प्रेयसीसोबत सापडले

शेअर करा

प्रेयसीसाठी अगदी काहीही करायला तयार असणारे प्रियकर कमी नाहीत . पुण्याच्या आजोबांनी मात्र प्रेयसीसोबत राहण्यासाठी भलताच कारनामा केला आहे, ज्यामुळे त्यांना जेलची हवा खावी लागली असून सध्या ते तुरुंगात आहेत. प्रेयसीसोबत राहण्यासाठी स्वत:च्या खुनाचा बनाव ६० वर्षांच्या या व्यक्तीने केला आणि त्यासाठी चक्क एक खून करून मयत व्यक्तीला स्वतःचे कपडे घातले आणि त्याचे शीर धडावेगळं केलं.

मयत व्यक्तीची ओळख पटू नये म्हणून त्याने हा मृतदेह पुन्हा रोटर मशिनमध्ये फिरवला मात्र अखेर हा सर्व प्रकार उघडकीस आला . पिंपरी चिंचवड पोलिसांनी सुभाष उर्फ केरबा छबन थोरवे नावाच्या व्यक्तीस अटक केली असून 10 दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेत रवींद्र भीमाजी घेनंद नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे खून केल्यानंतर आरोपी फरार झाला आणि मयत झालेल्या व्यक्तीवर मृत्यूनंतर केले जाणारे सगळे विधीही करण्यात आले. अगदी दशक्रिया विधीच्या कार्यक्रमाचे बॅनरही गावात लावण्यात आले आणि दशक्रिया विधीही उरकला गेला.पोलिसांना त्यांच्या गुप्त सूत्रांच्या माध्यमातून सुभाष उर्फ केरबा छबन थोरवे जिवंत असल्याचं समजलं म्हणून पोलिसांनी तपास केला आणि सुभाष थोरवेला अटक करण्यात आली.


शेअर करा