गिधाडांच्या थवा आला अन ‘ अस्तित्व ‘ संपवून गेला , अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

शेअर करा

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम राहिलेला नाही असाच एक गिधाडांचा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल झालेला असून त्यामध्ये अवघ्या काही सेकंदाच्या आत या गिधाडांनी एक हरीण फस्त केल्याचे दिसून येत आहे. सदर व्हिडिओ अवघ्या साठ सेकंदाचा असून 60 सेकंदाच्या आत या गिधाडांनी मयत पडलेल्या हरणाचे अस्तित्वच नष्ट केलेले आहे.

मायलस इरलीक नावाच्या एका फेसबुक पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला असून त्यामध्ये एक हरीण मयत अवस्थेत पडलेले दिसून येते आणि काही सेकंदाच्या आत एक एक करीत त्याच्याभोवती गिधाडे जमा होतात आणि त्याच्यावर ते सगळे तुटून पडतात. अवघ्या साठ सेकंदाच्या आत या हरणाचे गिधाडे पूर्णपणे अस्तित्व मिटवतात. गिधाडे ज्यावेळेस तिथून जातात त्यावेळी तिथे हरिण होते की नाही हे देखील दिसून येत नाही इतक्या विद्युत वेगाने मयत हरीणाचे मांस खाऊन गिधाडे तिथून गायब होतात.

गिधाड हा पक्षी नैसर्गिक साखळीत अत्यंत महत्त्वाचा असून कावळ्यांप्रमाणेच मयत झालेल्या प्राण्यांचे मांस खाऊन एक प्रकारे ते माणसाला रोगराई पासून वाचवतात मात्र गेल्या काही दिवसात या गिधाडांची संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी प्राण्यांची कत्तल करण्याच्या वेळी त्यांना इंजेक्शन दिली जातात त्यामुळे त्या इंजेक्शनचा मांस खाणाऱ्या गिधाडांवर देखील परिणाम होत असून त्यामुळे त्यांची संख्या कमी होत असल्याचे देखील दिसून येत आहे . कोकणात गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू असून त्याला काही प्रमाणात यश देखील येत आहे .


शेअर करा