गूढ उलगडलं..पत्नीच गुलूगुलू बोलून काढून घेत होती लोकेशन अन..

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून एका डिलिव्हरी बॉयच्या हत्येचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आलेले आहे. हरियाणातील हे प्रकरण असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली त्यावेळी डिलिव्हरी बॉय असलेल्या या व्यक्तीच्या पत्नीचे इतरत्र अफेअर असल्याचे माहिती समोर आली आणि त्यातूनच हा प्रकार घडल्याचे समोर आलेले आहे.

मयत तरुणाचे वडील रामदास गौतम यांनी पोलीस ठाण्यात आपला मुलगा बेपत्ता असल्या प्रकरणी तक्रार दिलेली होती. त्यांना तीन मुले आणि एक मुलगी असून सर्वांची लग्न झालेली आहेत. रामदास गौतम यांचा सर्वात धाकटा मुलगा संजय उर्फ गुड्डू हा एका कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. वडिलांच्या म्हणण्यानुसार मंगळवारी रात्री आम्हाला पलवल येथील एका ठिकाणी तो मृतदेह तो मयत अवस्थेत पडलेला आहे याची माहिती मिळाली. आम्ही तिथे पोहोचलो तर त्यावेळी त्याच्यावर गोळी झाडलेली होती आणि त्यात तो मयत झालेला होता. पोलिसांनी तपासाला त्यानंतर सुरुवात केली.

पोलिसांनी संजय याची पत्नी, घरातील इतर सदस्य आणि साथीदारांची देखील चौकशी केली मात्र संजय यांच्या पत्नीच्या बोलण्यात संभ्रम आढळून आल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि तिची चौकशी सुरू केली त्यावेळी तिचे शेजारी राहणाऱ्या गोपाल नावाच्या तरुणांसोबत प्रेमसंबंध होते आणि त्यात संजय हा अडथळा ठरत होता म्हणून त्याला मारण्याचा प्लॅन केला असे तिने सांगितलेले आहे.

गुन्ह्याची कबुली देताना पत्नीने आपण संजय याला फोन करून त्याचे मोबाईल लोकेशन विचारले आणि त्याचे लोकेशन आपल्या प्रियकरासोबत शेअर केले त्यानंतर रात्री काम आटोपून संजय घरी येत असताना त्याचे लोकेशन पुन्हा एकदा आपण प्रियकरासोबत शेअर केले आणि गोपाल याने गाठून संजय याच्यावर गोळी झाडली. गोळी झाडल्यानंतर त्याने आपल्याला काम फत्ते झालेले आहे असे देखील सांगितले ,’ अशी कबुली या पत्नीने दिलेली आहे .


शेअर करा