
दिल्लीत एक अत्यंत खळबळजनक घटना 31 डिसेंबरच्या रात्री उघडकीला आलेली होती. एका तरुणीला तब्बल 12 किलोमीटरपर्यंत कारने फरफटत नेले त्यात तिचा मृत्यू झाला. तरुणीच्या मृत्यू प्रकरणात आता अनेक खळबळजनक खुलासे होत असून तरुणीच्या सोबत असलेली दुसरी तरुणी हिने आमच्या गाडीला धडक बसली त्यानंतर मी एका बाजूला पडले आणि माझी मैत्रीण गाडीखाली आली मात्र गाडीचालकाने त्याकडे दुर्लक्ष करत सुमारे तिला फरफटत नेले असे म्हटले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे गाडीमध्ये असलेला मनोज मित्तल हा भाजपचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. मयत तरुणीसोबत असलेली मुलगी निधी तिने दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी ती गाडीखाली आली त्यावेळी तिने ‘ मला वाचवा मला वाचवा ‘ असा आरडाओरडा केला मात्र गाडी चालकाने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि तिला तसेच फरफटत नेले.
शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टवर कोणतीही जखम आढळून आलेली नाही त्यामुळे तिच्यावर बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार केल्याचे दिसून येत नाही असे म्हटले आहे मात्र आरोपींना शिक्षा होण्यासाठी म्हणून प्रत्यक्षदर्शी जबाब आणि सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले आहे . मयत तरुणी ही तिच्या कुटुंबियांचा एकमेव आधार होती .लग्न सोहळा समारंभाची ही कामे करत असायची आणि तिच्या उपजीविकेवर पूर्ण कुटुंब निर्भर होते अशा परिस्थितीत तिचा हा मृत्यू कुटुंबासाठी अत्यंत क्लेशदायक असून गोदी मीडियाने मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे नाव समोर आल्यानंतर मयत मुलीच्या चारित्र्यावर संशय प्रश्न उपस्थित करून निर्लज्जपणाची पातळी गाठलेली आहे तर दिल्ली पोलीस गृहमंत्री अमित शाह यांच्या अखत्यारीत असल्याने त्यांना प्रश्न विचारण्याची हिम्मत झालेली दिसून येत नाही.
मयत मुलगी हिने मद्यप्राशन केले होते असे देखील सांगण्यात येत असून एक प्रकारे आरोपींनी केलेले कृत्य हे अमानवीय होते हे दडवण्याचा प्रयत्न गोदी मीडियाकडून सुरू झाला आहे. गोदी मीडियाची विश्वासार्हता सध्या संपलेली असून केंद्र सरकारच्या पीआर एजन्सीचे काम इतकेच काय तो गोदी मीडियाचा लोकशाहीसाठी उपयोग राहिलेला आहे. मयत तरुणीने मद्यप्राशन केले हे जरी एक वेळ मान्य केले तरी गाडी खाली आलेल्या तरुणीला 12 किलोमीटरपर्यंत फरफटत नेऊन मारणे हे कुठल्या नैतिकतेला धरून आहे? . गोदी मीडियाबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून मीडियाने निर्लज्जपणाची पातळी गाठलेली पहायला मिळत आहे .