गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पत्रकारांचे ओढले पाय , नेमकं काय घडलं ?

शेअर करा

गौतमी पाटील हिच्या प्रत्येक कार्यक्रमाची सोशल मीडियात जोरदार चर्चा होते . तिच्या लावणीच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात प्रतिसाद मिळत असून तिच्या कार्यक्रमात होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी अनेकदा लाठीमार देखील करण्यात आलेला आहे. नाशिक येथे मंगळवारी आयोजित करणाऱ्या कार्यक्रमात देखील असाच प्रकार घडलेला असून दोन पत्रकारांना उपस्थित तरुणांकडून मारहाण करण्यात आलेली आहे. दोन्ही पत्रकारांवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. एका सेवाभावी संस्थेच्या वतीने रुग्णवाहिकेसाठी निधी जमवण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम त्रिंबक रोडवरील ठक्कर डोम येथे आयोजित करण्यात आलेला होता. तब्बल दोन तासांनी उशिरा हा कार्यक्रम सुरू झाला प्रेक्षक स्टेजवळ जमा होऊ लागल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी सुरू झाली. माध्यम प्रतिनिधींसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली होती मात्र गौतमी पाटील हिचा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेक्षकांना कुठलाच अडथळा नको होता त्यामुळे पत्रकार फोटो काढण्यासाठी स्टेजजवळ जाताना तिथे उपस्थित तरुणांसोबत त्यांचा वाद झाला आणि त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली.

गौतमी पाटील आणि गोंधळ ही परंपरा कायम राहिलेली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केलेली आहे. तरुणांनी यावेळी चक्क पत्रकारांचे पाय ओढायला सुरुवात केली त्यामुळे ते घसरून पडले आणि त्यांना दुखापत झाली सोबत उपस्थित इतर तरुणांनी देखील त्यांना मारहाण केलेली असून त्यांच्या कॅमेऱ्याचे देखील यावेळी नुकसान झालेले आहे . बंदोबस्ताला असलेले पोलीस गोंधळाच्या ठिकाणी नव्हते मात्र व्यासपीठावरून सूचना केल्यानंतर ते आले आणि त्यानंतर सौम्य लाठीचार्ज पोलिसांना करावा लागला त्यानंतर गर्दी आटोक्यात आली. पत्रकारांना मारहाण झाल्यानंतर या घटनेचा सर्वच स्तरात निषेध केला जात आहे.


शेअर करा