गौतमी पाटील येतेय दोन दिवस रजा द्या , व्हायरल अर्जामागील सत्य अखेर समोर

शेअर करा

सोशल मीडियावर दोन दिवसांपूर्वी गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आमच्या गावात आहे त्यामुळे मला रजा द्या असा एक अर्ज एसटी चालकाने केल्याचे वृत्त सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाले होते. व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये सदर चालक सांगलीच्या तासगाव डेपोतील असल्याचे दिसून आले होते त्यानंतर या प्रकाराची जोरदार चर्चा झाली मात्र अखेर तासगाव एसटी डेपोने यासंदर्भात खुलासा केलेला आहे.

तासगाव एसटी आगाराकडे असा कुठलाही अर्ज आलेला नाही असे विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले असून कुणीतरी केवळ खोडसाळपणा म्हणून असा अर्ज बनवून सोशल मीडियात व्हायरल करून दिलेला आहे असे म्हटलेले आहे. सदरचालक हा एसटी कर्मचारी असून तासगाव एसटी डेपोतच कामाला आहे मात्र त्याने अशी कुठलीही रजा मागितलेली नाही असे देखील विभागाकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे.

व्हायरल झालेल्या अर्जामध्ये 22 ते 23 मे रोजी गौतमी पाटील गावात येणार आहे म्हणून सुट्टी मिळावी असे रजेच्या अर्जात लिहिलेले होते त्यानंतर एसटी प्रशासनापासून सगळीकडे या अर्जाची चर्चा सुरू झाली आणि अखेर याची माहिती तासगाव आगारप्रमुख यांच्यापर्यंत देखील पोहोचली. ज्या चालकाच्या नावाने हा अर्ज लिहिलेला आहे हा चालक तिथे कार्यरत आहे मात्र त्याने असा कुठला अर्ज केलेला नाही असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे. कुणीतरी केवळ खोडसाळपणा म्हणून हा प्रकार केलेला आहे असे देखील स्पष्टीकरण यावेळी देण्यात आलेले आहे.


शेअर करा