
महाराष्ट्रातील जनतेसमोर आपली कला सादर करत ‘ सबसे कातील गौतमी पाटील ‘ अशी ओळख बनवलेल्या गौतमी पाटील हिचे अद्याप लग्न झालेले नसून तिला अनेक जणांचे विवाहाचे प्रस्ताव येत आहेत. गौतमी पाटील हिने माध्यमांसमोर बोलताना लवकरच तुम्हाला माझ्या लग्नाबद्दल मी स्वतःहून माहिती देईल असे सांगितलेले आहे अशातच बीड येथील एका तरुणाने तिला पत्र लिहून लग्नाची मागणी घातलेली आहे. बीड येथील या तरुणाचे नाव रोहन गलांडे असे असून तो केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
काय आहे गौतमी पाटील हिला लग्नासाठी लिहलेले पत्र ?
प्रिय गौतमी पाटील..तू भारी तुझ्या घरी पण तू होती का माझी परी , मी रोहन दादा गलांडे पाटील मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. पत्र लिहिण्याचे कारण एका मुलाखतीमध्ये तुला कसा जोडीदार हवाय हे सांगताना तू म्हणाली होती की , मी आता 25 वर्षांची आहे. लग्न करून घर संसार थाटावा अशी माझी इच्छा आहे फक्त मला माझ्या इच्छेप्रमाणे जोडीदार हवा आहे. मला मानसन्मान प्रसिद्धी पैसा नकोय फक्त त्याने मला कोणत्याही परिस्थितीत साथ द्यायला हवी. मी लहानपणी मुलींच्या शाळेत शिकली मला भाऊ नाही त्यामुळे पुरुष मंडळींशी माझा संबंध कधीच आलेला नाही. माझ्या संसाराचा भार आता एका पुरुषाने उचलावा अशी माझी मनापासून इच्छा आहे म्हणूनच मी आता लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेणार आहे.
तुझ्या वरील सांगितलेल्या सर्व अटी मला मान्य आहेत तरी मी रोहन दादा गलांडे पाटील तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे तरी तू जशी आहेस तशीच मला आवडली आहे. जरी तुझ्यासोबत कोणी लग्नाला तयार नसले तरी मी माणुसकीच्या नात्याने तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. माझे वय 26 वर्ष असून मी एक शेतकरी पुत्र आहे . शेती बागायती आहे, दुग्ध व्यवसाय आहे. तू जर माझ्यासोबत लग्नाला तयार असशील तर तू मला भेटायला ये . माझा पत्ता मुक्काम पोस्ट चिंचोली माळी ,तालुका केज जिल्हा बीड पिन कोड 431123 वरील पत्त्यावर तू मला भेटायला ये. मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे रोहन गलांडे ‘. विशेष म्हणजे रोहनने या पत्रात त्याचा मोबाईल नंबर देऊन सही देखील केलेली आहे