घरासाठीचा संघर्ष अखेर ‘ त्या ‘ घरातच संपला , पोलीस आले तेव्हा चक्क..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरात उघडकीस आलेली असून मोलमजुरी करणाऱ्या एका दांपत्याने आर्थिक अडचणीतून आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी समोर आलेला आहे. सिन्नर येथे घर घेण्यासाठी म्हणून हात उसने पैसे घेतल्यानंतर ते पैसे परत करण्यात आपल्याला अपयश आले म्हणून त्यांनी एकाच दोरीने गळफास घेतलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, रोहिदास रामा शिंपी ( वय 55 ) आणि शोभा रामा शिंपी ( वय 50 ) अशी मयत व्यक्तींची नावे असून गेल्या 30 वर्षांपासून आर्थिक अडचणीतून ते जात होते. मूळ जळगाव जिल्ह्यातील ते रहिवासी असून पोटापाण्यासाठी ते सिन्नर येथे आलेले होते. काही काळ कंपनीत रोजंदारी केल्यानंतर आपले घर घ्यावे यासाठी त्यांनी काही पैसे हात उसने घेतले आणि त्यानंतर घराची खरेदी केली. घराची खरेदी तर झाली मात्र हात उसने घेतलेले पैसे देण्यात त्यांना अपयश येत असल्याने ते आर्थिक संकटात सापडलेले होते.

आत्महत्या केल्यानंतर शेजाऱ्यांना देखील या प्रकाराची कल्पना नव्हती मात्र रात्री अंधार पडून देखील त्यांच्या घरातील दिवे लागले नाही म्हणून परिसरातील नागरिकांनी आवाज दिला त्यावेळी कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. घटनेची माहिती त्यांच्या मुलांना आणि पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी त्यांनी गळफास घेतल्याचे समोर आले. त्यांच्या आत्महत्येचे वृत्त येताच परिसरात शोककळा पसरलेली असून अवघ्या काही रुपयांसाठी या दांपत्याने गळफास घेतल्याने गरीब कुटुंबाच्या घरासाठी असलेल्या संघर्षाचे धक्कादायक वास्तव समोर आलेले आहे.


शेअर करा