चंद्रकांत पाटील यांनी म्हणून लावलंय ‘ फेस शील्ड ‘

शेअर करा

फेस शील्ड

महापुरुषाबद्दल वादग्रस्त ठरतील अशी विधाने भाजप नेते सतत करीत असून शाईफेक प्रकरणानंतर मात्र भाजपच्या नेत्यांनी सावधानता बाळगण्यास सुरुवात केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पुणे येथील पवनाथडी जत्रेत सामील होताना चक्क चेहऱ्यावर फेस शील्ड लावलेले पहायला मिळाले.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना, ‘ आपल्यावर शाई फेकून एखाद्याला समाधान मिळत असेल तर ते चांगले आहे मात्र आपण आता लावलेले फेसशील्ड हे शाईफेकीला घाबरून लावलेले आहे असे देखील काही जण म्हणू शकतात मात्र आपण हे डोळ्याच्या सुरक्षिततेसाठी लावलेले आहे. माझ्या डॉक्टरांनी मला हे वापरण्याचा सल्ला दिलेला आहे मात्र हे आपण घाबरून लावलेले नाही, ‘ असे देखील ते पुढे आवर्जून म्हणाले.


शेअर करा