चंद्रावर बसलेला पहिला भारतीय , कोणी केलीय ही पोस्ट ?

शेअर करा

चांद्रयान तीन मोहिमेत भारताने नेत्रदीपक कामगिरी केल्यानंतर सोशल मीडियावर सध्या वेगवेगळ्याचा मिम्सचा महापूर सुरू काही ठिकाणी चांद्रयान तीन मोहिमेवरून पाकिस्तानला निशाण्यावर घेण्यात येत आहे तर दुसरीकडे काही विनोदी मिम्स देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चित्रपट अभिनेते सचिन पिळगावकर यांनी अशाच स्वरूपाचा एक फोटो फेसबुकवर शेअर केलेला आहे.

सचिन पिळगावकर यांनी अभिनय केलेला ‘ अशीही बनवाबनवी ‘ चित्रपट एकेकाळी सुपरडुपर हिट झालेला होता. या चित्रपटात दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एका गर्भवती महिलेची भूमिका केलेली होती त्यामध्ये तिला दिवस गेल्यानंतर चंद्रावर बसून तिचे फोटो काढलेले होते. पुण्यात राहण्यासाठी अडचणी येत असल्याकारणाने चारजणांच्या चौकडीने मिळून हा कारभार केलेला होता. अभिनेते अशोक सराफ , सचिन पिळगावकर , लक्ष्मीकांत बेर्डे आणि सुशांत रे या कलाकारांनी या चित्रपटाच्या यशाला चार चाँद लावलेले होते.

सचिन पिळगावकर यांनी फेसबुकवर एक फोटो शेअर केलेला असून त्यामध्ये चंद्रकोरीवर गर्भवती असलेली असलेले लक्ष्मीकांत बेर्डे आपल्याला महिलेच्या वेशभूषेत दिसून येत आहेत. चांद्रयान तीन मोहिमेवर त्यांनी केलेली ही पोस्ट सोशल मीडियात जोरदार व्हायरल झालेली असून यापूर्वी देखील अशीही बनवाबनवी या चित्रपटावर अनेक मिम्स फेसबुक आणि इतर सोशल मीडियात प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेले आहेत .


शेअर करा