
देशात अनेक ठिकाणी वृद्ध दांपत्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून आपला मुलगा किंवा मुलगी श्रीमंत असो वा गरीब त्याने काही फरक पडत नाही मात्र नवरा गेल्यानंतर वृद्ध महिलांना सांभाळण्यास अनेक ठिकाणी टाळाटाळ केली जात आहे. अशीच एक संतापजनक घटना उत्तर प्रदेशात समोर आलेले असून अब्जाधीश म्हणून ओळख असलेल्या एका कुटुंबातील 87 वर्षीय आजींना सांभाळण्यास त्यांच्या चारही मुलांनी नकार दिल्यानंतर वृद्धाश्रमात राहण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. जोपर्यंत हातपाय चालत होते तोपर्यंत रक्ताचे पाणी करून मुलांना लहान मोठे केलं मात्र पती गेल्यानंतर दिवस फिरले आणि त्यानंतर या वृद्ध आजींना सांभाळण्यास सर्वांनीच नकार दिलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, विद्यादेवी असे या आजींचे नाव असून आग्रा येथील प्रसिद्ध डोळ्यांच्या हॉस्पिटलचे संस्थापक असलेले गोपीचंद अग्रवाल यांच्या त्या पत्नी आहेत. एकेकाळी गोपीचंद अग्रवाल हे शहरातील प्रसिद्ध अब्जाधीश म्हणून ओळखले जायचे. विद्यादेवी त्यांच्या आलिशान महालामध्ये चार मुलांच्या सोबत राहायच्या. चारही मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण दिले त्यानंतर त्यांचे लग्नही लावून दिले आणि तेरा वर्षांपूर्वी गोपीचंद यांचे निधन झालं त्यानंतर विद्यादेवी यांच्यावर अशी वेळ येईल याची त्यांनी कधी कल्पनाही केलेली नव्हती.
मुलांनी संपत्तीचे विभाजन केले आणि आपापला हिस्सा घेतला मात्र आजीला काहीही दिले नाही. अग्रवाल कुटुंबाची ट्रॅक्टरचे पार्ट बनवण्याची देखील कंपनी असून घरी बंगले प्रचंड पैसा असून देखील त्यांना सांभाळणारे कोणीही नाही. काही दिवस मोठ्या मुलासोबत आधी राहिल्या मात्र मोठ्या सुनेने त्यांना त्रास देण्यास सुरू केले त्यानंतर दुसऱ्या मुलाकडे त्यानंतर तिसऱ्या मुलाकडे आणि चौथ्या मुलाकडे देखील त्या गेल्या मात्र सगळीकडे तशाच स्वरूपाचा अनुभव आला. एका सुनेने तुमच्या कपड्यांचा वास येतोय असे म्हटले तर दुसरीने तुम्हाला नदीत फेकून देऊ अशी देखील धमकी दिली. हतबल झालेल्या आजी यांना जावे कुठे असा प्रश्न उभा राहिलेला होता.
महिला मंचाच्या अध्यक्षा असलेल्या असलेले शशी गोयल यांनी मुलांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी काहीही ऐकून घेतले नाही आणि अखेर 19 डिसेंबर रोजी रामलाल वृद्धाश्रमात त्यांनी आपले राहते घर सोडून आपले कपडे आणि जीवन उपयोगाच्या वस्तू घेऊन राहण्यास सुरू केलेले आहे. अत्यंत दुर्दैवी असा हा आता या आजींना स्वतःचा हक्क वयाच्या 87 व्या वर्षी लढवून मिळवावा लागणार आहे.