चार राज्यात सहा बायका , ‘ असा ‘ आला प्रकार उघडकीस

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्याच प्रकारची जोरदार चर्चा सुरू असून या व्यक्तीने तब्बल चार राज्यांमध्ये सहा बायका केल्या होत्या. बिहारमधील जमुई स्टेशनवर हा प्रकार उघडकीला आला असून एका मेव्हण्याने त्याच्या भाऊजीला इतर महिलेसोबतच रेल्वे स्टेशनवर पकडले त्यानंतर त्याने कुटुंबियांना इथे बोलावले आणि प्रकरण पोलिसात गेल्यानंतर या व्यक्तीने चार राज्यांमध्ये सहा लग्न केली असल्याचा प्रकार समोर आला.

उपलब्ध माहितीनुसार, छोटू कुमार असे आरोपीचे नाव असून त्याला पहिल्या पत्नीपासून चार मुले आहेत तर दीड वर्षांपूर्वी त्याने सोडून दिलेल्या पत्नीपासून देखील त्याला दोन मुले आहेत. छोटू याची दुसरी पत्नी मंजू तिचा भाऊ विकास हा कोलकत्ता येथे जाण्यासाठी जमुई स्टेशनवर आलेला होता त्यावेळी त्याने त्याचा दाजी असलेला छोटू याला एका महिलेसोबत पाहिले. त्याने तात्काळ कुटुंबियांना या प्रकाराची खबर दिली आणि सर्वजण रेल्वे स्टेशनवर पोहोचले तिथे आल्यानंतर जोरदार वादावादी सुरू झाली आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.

मंजू हिच्यासोबत छोटू याचे 2018 साली लग्न झालेले आहे त्यांना दोन मुले देखील आहे मात्र लग्नाच्या तीन वर्षांनी छोटू हा औषध आणण्यासाठी म्हणून बाहेर पडतो असे सांगत निघून गेला तो पुन्हा आलाच नाही. त्याच्याविरोधात पोलिसात देखील तक्रार करण्यात आली होती मात्र तो आढळून आला नाही. आर्केस्ट्रा मध्ये छोटू गायक म्हणून काम करत असून त्याने साकावरिया, सुंदरकांड, रांची, संग्रामपूर, दिल्ली आणि देवघर येथे आतापर्यंत सहा लग्न केले असून त्या सर्वांना मुले झालेले आहेत असे देखील त्याचे म्हणणे आहे. तक्रारदार व्यक्ती हे दुसऱ्या पत्नीचे कुटुंबीय असून पोलिस त्याचे कारनामे फसवणूकपर्यंतच आहेत की आर्थिक फसवणूक देखील त्याने केली आहे याचा शोध घेत आहेत.


शेअर करा