चित्ते तर आले खाऊ काय घालणार ,बिश्नोई बांधव का करत आहेत आंदोलन ?

शेअर करा

मोठा गाजावाजा करून भारतात आठ चित्ते आणण्यात आले. गोदी मीडियाने देखील हा दिवस म्हणजे एक उत्साह असल्यासारखाच साजरा केला मात्र चित्ते भारतात येताच त्यावर राजकारण सुरू झाले असून त्यांना भोजनासाठी म्हणून हरिणांसोबत इतर जिवंत प्राणी देण्यात येत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. हरियाणातील बिश्नोई समाज यांनी सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. नागरिकांना वाढती महागाई , बेरोजगारी यापासून लक्ष विचलीत करण्यासाठी गोदी मीडियाने चित्यांचा वापर केला मात्र आता सरकार विरोधात आंदोलन सुरु झाल्याने गोदी मीडियाने मौन बाळगले आहे.

नामिबिया या देशातून आणून हे आठ चित्ते मध्य प्रदेशातील जंगलात सोडण्यात आले होते मात्र त्यांना खाण्यासाठी म्हणून चक्क जिवंत हरीण आणि काळवीट सोडत असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. बिश्नोई समाज हा काळवीटाची पूजा करतो आणि आणि समाजामध्ये त्याला शुभ म्हणून मान्यता आहे असे असताना जिवंत सोडत असलेल्या या प्राण्यांची शिकार चित्ते करतील म्हणून आपल्या भावना दुखावल्या जात आहेत असेही समाज बांधवांचे म्हणणे आहे.

हरियाणातील फतेहाबाद येथे बिश्नोई समाजाने आंदोलन सुरू केले असून जिवंत हरिण आणि काळवीट यांना अन्न म्हणून टाकण्यास समाजाचा विरोध आहे . सरकार त्याच्या संरक्षणासाठी मोहीम राबवत असले तरी हरणांचा देखील बचाव करावा अशीही मागणी केली जात आहे . हरिणांच्या अनेक प्रजाती नामशेष होत असून सरकारने आमच्या म्हणण्याची दखल घ्यावी असेही म्हटलेले आहे. समाजातील लॉरेन्स बिश्र्नोई याने सलमानखान याने कथित काळविटाची शिकार केली म्हणून त्याच्या देखील हत्येची सुपारी घेतली होती ती देखील याच कारणावरून..


शेअर करा