चुलतीच्या मोबाईलमध्ये पुतण्याचे सिमकार्ड , ‘ मास्टरप्लॅन ‘ फसला अन..

शेअर करा

एक खळबळजनक असा प्रकार झारखंड राज्यातील गढवा जिल्ह्यात समोर आलेला असून एका महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली त्यावेळी अनेक खळबळजनक असे खुलासे झालेले आहेत. मयत महिलेचे वय 23 वर्ष असून पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे. मयत महिलेच्या घरी पोलिस पोचले आणि महिलेच्या मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्ड काढल्यानंतर जे काही सत्य समोर आले ते पाहून पोलीस देखील चकित झाले.

सदर प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केलेली असून त्याचे नाव सद्दाम अन्सारी असे असल्याचे समजते. महिलेच्या मोबाईलमध्ये असलेले सिम कार्ड हे सद्दाम अन्सारी याचे होते आणि तो नात्याने या महिलेचा पुतण्या लागत होता असेही तपासात समोर आलेले असून सद्दाम याचे वय 25 वर्ष आहे. खरपो गावातील तो रहिवासी असून त्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सर्व प्रकार कथन केलेला आहे.

मयत महिलाही नात्याने सद्दाम याची चुलती लागत होती. तिचे लग्न सद्दाम याचा काका हबीबुल्ला याच्यासोबत झालेले होते त्यानंतर लग्नाला काही वर्ष झाल्यानंतर आरोपी सद्दाम आणि या महिले प्रेमसंबंध सुरू झाले. सद्दाम हा नात्याने आपला पुतण्या लागतोय याचे देखील या महिलेला भान राहिले नाही आणि त्यांनी चुलता घरी नसताना एकमेकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली. काही दिवस उलटल्यानंतर ही महिला त्याला लग्नासाठी गळ घालू लागली मात्र सद्दाम याला तिच्यासोबत लग्न करायचे नव्हते म्हणून त्याने तिला मारण्याचा प्लॅन केला.

मयत महिलेला महिले सद्दाम याने या महिलेला एका ठिकाणी भेटण्यास बोलावले आणि त्यानंतर तिच्या डोक्यावर लोखंडी रोडवर केले त्यामध्ये ती मृत्युमुखी झाली त्यानंतर त्याने तिला रस्त्यावर फेकून दिले. तिच्या अंगावरून अनेक वाहने गेली आणि त्यानंतर हा प्रकार अपघात असल्याचे त्यांनी भासवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात त्याचा हा बनाव समोर आला. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आलेली आहे.


शेअर करा