
छत्रपती संभाजी नगरमधील एका तरुणाने ‘ चोर आले 50 खोके घेऊन ‘ अशा आशयाचे एक गाणे गात सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केलेला होता त्यानंतर या तरुणाला त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आलेली असून पोलिसांनी त्यांच्या घरी दाखल होत त्याला ताब्यात घेतलेले आहे. त्याने उल्लेख केलेल्या गाण्यांमध्ये 50 खोके असा शब्द असल्याकारणाने बहुदा सत्ताधारी पक्षाला हा शब्द झोंबला असून त्यानंतर कारवाई केल्याची चर्चा सोशल मीडियामध्ये सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी एक ट्विट करत राज्यात पोलीस राज नाही असा इशारा दिलेला आहे.
काय आहे जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट ?
राम मुंगासे या नवोदित कलाकाराने एक गाणं म्हटलं म्हणून त्याच्या घरातून संभाजीनगर पोलीसांनी त्याला अटक केली व ते त्याला अंबरनाथ पोलीसांच्या हाती देतील. पण, त्याचा गुन्हा काय ? त्याने तर कोणाचे नाव देखिल घेतले नव्हते. 50 खोके हे कोणाचे नाव आहे का हे आधी पोलीसांनी स्पष्ट करावं. 50 खोके या वक्तव्याने जातीय तणाव किंवा धार्मिक तणाव निर्माण होतो कसा हे पोलीसांनी सिद्ध करावं. म्हणजे संविधान पायदळी तुडवण्याचाच निर्णय झाला आहे असे दिसतं. आम्ही सगळे राम मुंगासे याच्या पाठिशी आहोत. संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठिशी उभा राहील. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा गोठू शकत नाही. हे पोलीसी राज नाही.
राम मुंगासे या नवोदित कलाकाराने एक गाणं म्हटलं म्हणून त्याच्या घरातून संभाजीनगर पोलीसांनी त्याला अटक केली व ते त्याला अंबरनाथ पोलीसांच्या हाती देतील. पण, त्याचा गुन्हा काय ? त्याने तर कोणाचे नाव देखिल घेतले नव्हते. 50 खोके हे कोणाचे नाव आहे का हे आधी पोलीसांनी स्पष्ट करावं. 50… pic.twitter.com/9IOz4XUZ5X
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 6, 2023