
महाराष्ट्रात एक धक्कादायक अशी घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील बाबा पेट्रोल पंप चौकाजवळ समोर आलेली असून पंचवटी हॉटेलमध्ये एका प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे . 7 सप्टेंबरला दुपारी बारा वाजता ही घटना समोर आलेली आहे .
उपलब्ध माहितीनुसार , ऋषिकेश राऊत ( वय 26 राहणार सोनार गल्ली बिडकीन ) आणि दिपाली मरकड ( वय 18 राहणार ढाकेफळ तालुका पैठण सध्या राहणार बिडकीन ) अशी मयत प्रेम युगुलाची नावे असून वेदांतनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.
ऋषिकेश हा एका ठिकाणी ग्राफिक डिझाईनिंगचे काम करायचा तर दिपाली बीएच्या दुसऱ्या वर्गात शिकत होती . एकाच गल्लीत रहायला असल्याने त्यांची ओळख झालेली होती. दिपाली हिचे वडील नोकरीनिमित्त बिडकीनमध्ये राहायचे. पाच सप्टेंबर रोजी संध्याकाळी ऋषिकेश हा गायब झालेला होता त्यानंतर तो दिपाली हिचे मूळ गाव असलेले ढाकेफळ येथे गेला आणि त्याहून त्याने तिला सोबत घेतले आणि दोघेही पंचवटी हॉटेल इथे आलेले होते. त्यांची कागदपत्रे पाहिल्यानंतर मॅनेजरने त्यांना रूम उपलब्ध करून दिली.
सकाळी बराच वेळ झाला तरी रूममध्ये कुठलीच हालचाल दिसेना म्हणून शंका आली म्हणून आवाज दिला मात्र त्याला काहीही प्रतिसाद आतून मिळाला नाही. त्यानंतर वेटर याने लँडलाईनवर फोन लावला मात्र तो देखील उचलण्यात आला नाही म्हणून अखेर दुसऱ्या चावीने दरवाजा उघडून पाहिला त्यावेळी दोघांनीही गळफास घेतलेला होता. वेदांत नगर पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.