छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अखेर भूमिपूजन , संग्राम जगताप म्हणतात की ?

शेअर करा

नगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडले . गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याची मागणी अनेक संस्था आणि राजकीय पक्षांकडून करण्यात येत होती . अखेर आंदोलन करण्यात आले आणि पुतळा उभारण्याचा मार्ग सोपा झाला. आमदार संग्राम जगताप यांनी याविषयी एक फेसबुक पोस्ट लिहिलेली असून त्यामध्ये आपल्याला हा बहुमान मिळाल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार व्यक्त केलेले आहेत.

काय आहे संग्राम जगताप यांची पोस्ट ?

प्रोफेसर चौक येथे मनपाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणी कामाचे भूमिपूजन माझ्या हस्ते संपन्न झाले. अठरा फुटी चबुतऱ्यावरती छत्रपती संभाजी महाराजांचा बारा फुटी पूर्णाकृती पुतळा असे या स्मारकाचे स्वरूप असून या स्मारकातून आपल्या गौरवशाली इतिहासाला उजाळा मिळेल. या स्मारकाचे भूमिपूजन करताना मला स्वतःला एक शिवभक्त म्हणून आनंद होत आहे.

महापुरुषांच्या इतिहासातून आपल्याला काम करण्याची ऊर्जा व प्रेरणा नेहमीच मिळत असते. यासाठीच नगर शहरामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य दिव्य असा पुतळा उभा राहत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे. याचबरोबर माळीवाडा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी सतत पाठपुरावा सुरु असून त्याला लवकरच यश मिळेल. कृती समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी उपोषण करण्यात आले होते. त्यानंतर तातडीने मनपा प्रशासनाने हे काम सुरू केले आहे. शहर विकासाच्या कामांमध्ये पक्षीय राजकारण बाजूला ठेवून विकास कामांना गती देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. मात्र काही कर्तृत्वशून्य लोक मतांच्या राजकारणासाठी या विकास कामांमध्ये खो घालण्याचे काम करत आहेत. इथून पुढील काळातही नगरकरांना सदैव बरोबर घेऊन शहरच्या विकासाला गती देऊ.

या भूमिपून कार्यक्रमावेळी महापौर रोहिणी ताई शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त डॉ. पंकज जावळे, स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, महिला बालकल्याण समिती सभापती पुष्पाताई बोरुडे, उपसभापती मीनाताई चोपडा, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेवक श्याम आप्पा नळकांडे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, माजी नगरसेवक तायगा शिंदे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे, पुतळा कृती समितीचे अजिंक्य बोरकर, शहर अभियंता मनोज पारखे, जल अभियंता परिमल निकम, इंजिनिअर रोहिदास सातपुते, इंजिनिअर श्रीकांत निंबाळकर, उद्यान प्रमुख शशिकांत नजान, सुमित कुलकर्णी, संजय सपकाळ, इंजिनियर केतन क्षीरसागर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शेअर करा