जम्मू काश्मीरमधून कलम 370 का हटवलं ? , सुप्रीम कोर्टात सरकारचे अजब उत्तर

शेअर करा

जम्मू काश्मीरमधून कलम 370 काढण्यात आल्यानंतर सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 लागू करावे या संदर्भात अनेक याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना केंद्र सरकारने कलम 370 काढण्याचे कारण जे काही सांगण्यात आलेले आहे ते देखील तितकेच अजब आहे. भारताचे सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता यांनी ही माहिती सुप्रीम कोर्टाला दिलेली आहे.

जम्मू काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हे मोदी सरकारने काढल्यानंतर तब्बल काही महिने संपूर्ण जम्मू-काश्मीरची जनता घरात कैदेत होती. जागतिक पातळीवर देखील याविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. कलम 370 रद्द करताना जी काही संवैधानिक प्रक्रिया करणे गरजेचे होते ती झालेली नाही असा दावा सुप्रीम कोर्टातील याचिकांमध्ये दाखल करण्यात आलेला आहे या सर्व याचिकांवर सध्या सुप्रीम कोर्टात एकत्रितरित्या सुनावणी सुरू आहे.

सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला कलम 370 हटवण्यामागचे कारण काय आहे हे विचारले त्यानंतर भारताचे सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता यांनी कोर्टाला उत्तर देताना ‘ पुलवामा हल्ल्यामुळे आम्ही कलम 370 हटवलं ‘ असे म्हटलेले आहे. सॉलिसिटर यांच्या या उत्तराची सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे.


शेअर करा