जय शाह..आयपीएल फायनलमध्ये ‘ असलं ‘ काय करत होतात ? : व्हिडीओ

शेअर करा

आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंगने गुजरात टायटनचा दणाणून पराभव केलेला आहे. शेवटच्या दोन चेंडूत दहा धावा काढून पूर्णपणे फासा पलटवत चेन्नई सुपर किंग विजयी झाली आणि गुजरातच्या भूमीवरच गुजरातचा दारुण पराभव झाला. सामना गुजरातमध्ये असल्या कारणाने बीसीसीआयचे सचिव जय शाह हे देखील या सोहळ्याला या मॅचला उपस्थित होते. गुजरात जिंकत आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी एक ‘अजब ‘ प्रतिक्रिया हाताने दिलेली होती त्याची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे.

सदर सामन्यांमध्ये चेन्नईला 15 ओव्हरमध्ये 171 धावांचे लक्ष मिळालेले होते. शेवटच्या चेंडूवर चेन्नईने विजय मिळवला मात्र त्याआधीच्या काही चेंडूमध्ये सहजासहजी हा विजय गुजरातला मिळू शकेल असे चित्र होते. जय शहा यांनी सामना पाहत असताना एक अजब अशी रिएक्शन दिली. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झालेला आहे .

जय शाह यांच्या या अजब रिऍक्शनवर सोशल मीडियात वेगवेगळी चर्चा सुरू असून हा नक्की काय प्रकार आहे हे जय शहा यांनी प्रेक्षकांना समजून सांगावे अशी देखील विनंती त्यांना अनेक जणांनी केली आहे. क्रिकेट मॅच लाईव्ह असताना जय शहा यांनी हा प्रकार केला . सार्वजनिक ठिकाणी त्यांचे असे वर्तन आक्षेपार्ह कॅटेगिरीमध्ये देखील बसावे असे आहे मात्र अर्थातच यावर कुठलीही कारवाई होण्याची शक्यता दिसून येत नाही मात्र नेटिजन्स या प्रकाराचा जोरदार समाचार घेत आहेत.. जय शाह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव आहेत .


शेअर करा