जर्मन टेक्नॉलॉजी म्हणत कार्पेटवर ओतलं डांबर , गावकऱ्यांनी रस्ता गुंडाळला

शेअर करा

खराब रस्ते हे आपल्या भारतीयांच्या पाचवीला पुजलेले असून कितीही चांगले रस्ते केले तरी अवघे एक ते दोन पाऊस झाले की हे रस्ते पुन्हा पूर्ववत होतात . महाराष्ट्रासह संपूर्ण देशात असेच चित्र असून खड्डे बुजवण्यासाठी एका कंत्राटदाराने केलेल्या अजब प्रकाराची सध्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे . विशेष म्हणजे या महाशयांनी खडी मुरूम काहीही न टाकता रस्त्यावर एक कार्पेट आणून टाकले आणि त्यावर डांबर टाकून रस्ता तयार केला. नागरिकांनी हा रस्ता हाताने उचलून बाजूला केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

उपलब्ध माहितीनुसार , जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कर्जत हस्तपोखरी इथे हा प्रकार समोर आलेला असून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम करण्यात आलेले होते. जर्मन टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण हा रस्ता बनवलेला आहे असा दावा त्याने केला मात्र नागरिकांनी त्याचा हा रस्ता गुंडाळून बाजूला ठेवलेला आहे. रस्ता बनवताना खडी वाळू आणि डांबर यांचे मिश्रण वापरले जाते मात्र या कंत्राटदाराने काम तमाम केलेले आहे . संतापलेले गावकरी आता हे महाशय कोण आहेत याचा शोध घेत आहेत.


शेअर करा