‘ जलेबी बाबा ‘ चा न्यायालयाकडून एकदम करेक्ट कार्यक्रम

शेअर करा

तब्बल 120 महिलांवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार करणारा भोंदूबाबा असलेला जिलेबी बाबा याला अखेर जलद गती न्यायालयाने शिक्षा ठोठावली असून 14 वर्षांचा तुरुंगवास त्याला भोगावा लागणार आहे तर सोबत पस्तीस हजार रुपये दंड . बलात्कारासाठी त्याला सात वर्षांची शिक्षा , पॉक्सो कायद्याअंतर्गत 14 वर्षांची शिक्षा आणि कलम 67 नुसार पाच वर्षांची शिक्षा त्याला ठोठावण्यात आलेली आहे.

बाबा अमरपुरी असे त्याचे खरे नाव असून पाच जानेवारी रोजी त्याला न्यायालयाने दोषी ठरवलेले होते त्यानंतर 10 जानेवारी रोजी त्याला शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. महिलांसोबत अत्याचार केल्यानंतर तो या प्रकाराचा व्हिडिओ बनवायचा आणि वेळोवेळी त्यांना आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बोलावून घेत असायचा. चहाच्या नशेतून तो महिलांना प्रथम गुंगीचे औषध द्यायचा आणि एकदा त्यांना गुंगी आली की त्यांच्यावर अत्याचार करून त्याचा व्हिडिओ बनवायचा. पोलिसांनी कारवाई केली त्यावेळी त्याच्या रूममध्ये आक्षेपार्ह साहित्य तसेच तब्बल 120 व्हिडिओ हाती लागलेले होते. 13 ऑक्टोबर 2017 रोजी एका महिलेने टोहाना शहर पोलिसात त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तपासाला सुरुवात केली.

अमरपुरी उर्फ जलेबी बाबा हा पंजाबमधील माणसा जिल्ह्यातील रहिवासी असून तो वीस वर्षांपूर्वी टोहना येथे आलेला होता. आल्यानंतर त्याने जिलेबीचे दुकान चालू केले आणि त्यानंतर दहा वर्ष हा व्यवसाय केला. त्याची पत्नी वारली त्यामुळे तो नैराश्यात गेला आणि आपण आता पंजाबला चाललो आहे असे सांगून तो पंजाबला निघून गेला. पंजाब इथून परतल्यानंतर त्याने आपण पंजाबला जादूची विद्या शिकून आलेलो आहे असे सांगत लोकांना आपल्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर हळूहळू त्याच्याकडे भक्तगण वाढू लागले. अनेक महिला देखील त्यांच्या कौटुंबिक अडचणी सांगण्यासाठी या बाबाकडे येत असायच्या त्यानंतर त्याने त्यांचे कष्ट आणि दुःख निवारण करण्याच्या बहाण्याने यांच्याशी जवळीक साधण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार केले होते.


शेअर करा