‘ जा सिमरन जी ले अपनी जिंदगी ‘ , नवविवाहितेला प्रियकरासोबत दिलं पाठवून

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका विवाहाची जोरदार चर्चा सुरू असून लग्नानंतर अवघ्या वीस दिवसात आपल्या पत्नीचे लग्नाआधी इतरत्र अफेअर होते आणि ती त्याच्यासोबत जास्त सुखाने राहिली राहू शकली असती याचा अंदाज आल्यानंतर पतीने तिला तिच्या प्रियकरासोबत पळून जाण्यास परवानगी दिलेली आहे . महिलेने लग्न होताच आपले दुसऱ्या पुरुषांवर प्रेम आहे असे सांगितले होते त्यानंतर तिच्या पतीने हा प्रकार केलेला असून त्याच्या या दिलदारपणाचे सोशल मीडियात कौतुक केले जात आहे.

उपलब्ध माहितीनुसार, झारखंडमधील पालम जिल्ह्यातील गावात हा प्रकार घडलेला असून मनतो पोलीस स्टेशनचे प्रभारी कमलेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार सरोज कुमार सिंग नावाच्या एका तरुणाचा विवाह दहा मे रोजी प्रियंका कुमारी नावाच्या तरुणी सोबत झालेला होता. लग्नानंतर प्रियंका खुश नसल्याचे सरोज यांना जाणू लागले त्यावेळी तिने आपल्याच गावात राहणाऱ्या जितेंद्र नावाच्या तरुणासोबत आपले प्रेमसंबंध होते याची माहिती पतीला दिली.

सरोज यांनी तिला पुढील काळात तुला आपल्याबरोबर राहायचे आहे का तुला प्रियकरासोबतच राहण्याची इच्छा आहे असे विचारले त्यावेळी तिने हा विवाह आपल्या मनाविरुद्ध झालेला असून आपल्याला आपल्या प्रियकरासोबतच विवाह करायचा होता असे सरोज यांना सांगितले. त्यानंतर वीस दिवसातच प्रियंका कुमारी ही घरातून पळून जितेंद्र यांच्यासोबत पळून जाण्याच्या प्रयत्नात होती मात्र ग्रामस्थांनी जितेंद्र आणि प्रियंका कुमारी यांना पकडले आणि पोलीस ठाण्यात घेऊन आले.

सदर घटनेची माहिती प्रियंका कुमारी हिच्या पतीला द्यावी म्हणून त्यांना पोलिसात बोलावण्यात आले त्यावेळी प्रियंका कुमारी हिचे पती सरोज कुमार यांनी या सर्व प्रकाराची आपल्याला कल्पना आहे आणि तिची जर जितेंद्र सोबतच राहण्याचे इच्छा असेल तर माझी काहीही हरकत नाही असे सांगत पत्नीच्या प्रियकारासोबत राहण्याच्या मागणीला होकार दर्शवलेला असून त्यानंतर पोलीस स्टेशनमधूनच प्रियंका जितेंद्र यांच्यासोबत निघून गेली. सरोज यांनी दाखवलेल्या या दिलदारपणाचे कौतुक केले जात आहे.


शेअर करा