जिच्यासाठी लिंगबदल केला तिचंच ‘ मन ‘ बदललं अन ..

शेअर करा

एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशी घटना उत्तर प्रदेशातील झाशी इथे समोर आलेली असून प्रेमात पडल्यानंतर एका तरुणीने दुसऱ्या तरुणीसाठी चक्क लिंग बदल करून स्वतःची शस्त्रक्रिया करून घेतली मात्र त्यानंतर त्यांचा संसार फार काळ टिकला नाही आणि त्यांच्यात वाद सुरू झाले. सोनल आणि सना अशी त्यांची नावे असून दोघींनी एकमेकींवर फसवणुकीचे आरोप केलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, 2016 साली झांसी येथे राहत असलेल्या सोनलच्या कुटुंबाने सरकारी नोकरी करत असलेल्या सना हिला आपल्या घरात पेइंग गेस्ट म्हणून प्रवेश दिला आणि त्यानंतर तिचे आणि सोनलचे प्रेम प्रकरण सुरू झाले. अवघ्या चार महिन्यांमध्ये दोघी एकमेकींच्या प्रेमात पडल्या आणि हा प्रकार घरी लक्षात आल्यानंतर त्यांनी सना हिला घरातून हाकलून दिले.

सना हिला याचा फारसा फरक पडला नाही कारण तोपर्यंत तिला राहण्यासाठी सरकारी कॉर्टर मिळालेले होते. 10 ऑगस्ट 2017 रोजी सना ही तिथून निघून सरकारी घरात राहायला गेली त्यानंतर चारच दिवसात सोनल हिला तिचा विरह सहन होत नसल्याने ती देखील तिच्यासोबत सरकारी कॉर्टर मध्ये राहायला गेली . काही दिवस सोबत राहिल्यानंतर यापुढील काळात आपल्याला जगणे अवघड होईल. आपल्या शारीरिक गरजा पूर्ण होणार नाही याची जाणीव झाल्याने सोनल हिने सना हीला लिंग बदल करून पुरुष बनण्यास सांगितले.

सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये 2020 साली एक शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यानंतर सना हीने स्वतःचे नाव बदलून सोहेल खान असे नाव करत लिंग बदल करून ती पुरुष झाली. सोनल हिनेदेखील आपण सोहेल खान याची पत्नी आहोत म्हणून स्वाक्षरी देखील केली मात्र त्यानंतर सोनल हिला एका हॉस्पिटलमध्ये नोकरी लागली आणि त्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. सोनल ही सना हिला टाळू लागली आणि एके दिवशी ती तिथून निघून गेली. जिच्यासाठी आपण लिंग बदल करून पुरुष झालो तिनेच दगा दिल्याने अखेर प्रकरण पोलिसात पोहोचले आहे .


शेअर करा