जिल्ह्यात ऊस वाहतूक ठरतेय जीविताशी खेळ, कारवाई शून्य

शेअर करा

नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी सध्या ऊस वाहतूक सुरू असून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना कुठल्याच पद्धतीचे सुरक्षा उपाय तर नाहीतच मात्र त्यांचीही ऊस वाहतूक इतर वाहन चालकांसाठी देखील धोकादायक ठरत आहे. मोठ्या आवाजात लावलेली गाणीसोबतच वाहनाला साधे रिप्लेक्टर देखील नाही त्यामुळे ही वाहतूक त्यांच्यासोबतच इतर वाहनचालकांसाठी देखील जीवघेणी ठरत आहे.

ऊसतोडणी हंगाम सध्या सुरू असून नगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ट्रॉली आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून हा ऊस कारखान्यापर्यंत पोहोचवण्यात येतो मात्र ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉली यांच्याकडे वाहतूक विभागाचे संपूर्ण दुर्लक्ष होत असून अद्यापपर्यंत एकही कारवाई अशा बेलगाम चालकांवर करण्यात आलेली नाही. मोठ्या आवाजात चित्रपटातील गाणी लावत आणि वाहतुकीच्या नियमांची सर्रास पायमल्ली करत क्षमतेपेक्षा अधिक पाऊस या वाहनांमध्ये भरला जातो त्यामुळे अनेकदा अपघात होण्याचा धोका निर्माण झालेला असून याआधी देखील अशा दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत.

ऊस वाहतूक करण्यासाठी ठराविक अशी कुठलीही वेळ नसल्याने रात्री-अपरात्री देखील रिफ्लेक्टर न लावलेले वाहन अरुंद रस्त्यावर धावत असून अशी वाहने ट्रॉली चालकासोबतच इतर वाहनांसाठी देखील धोकादायक झालेली आहेत. डबल ट्रॉली ऊस वाहतूक करणारे वाहनचालक कुठल्याच नियमाला मानत नसल्याने तसेच कारवाई देखील होत नसल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे .


शेअर करा