‘ जिवाभावाची ‘ झाल्यावर तरुणी मैत्रिणीसोबत लग्नासाठी राजस्थानला

शेअर करा

देशात एक खळबळजनक घटना समोर आली असून मध्य प्रदेशातील एका महिलेने राजस्थान येथील दुसऱ्या एका मैत्रिणीच्या घरी जाऊन तिला लग्नाची मागणी घातली . या दरम्यान या महिलेने मोठ्या प्रमाणात गोंधळ घातल्याने तिला अटक करण्यात आलेली आहे. मैत्रिणीसोबत विवाह करायचा आहे म्हणून ती अडून बसली होती त्यातून तिने मध्यप्रदेशातून चक्क राजस्थान गाठले होते.

उपलब्ध माहितीनुसार, सदर तरुणीची राजस्थान येथील या तरुणीशी सोशल मीडियावर ओळख झालेली होती त्यातून त्यांच्यात जिवाभावाची मैत्री तयार झाली आणि तिच्यासोबतच लग्न करायचे या आशेने मध्यप्रदेशातील ही तरुणी राजस्थानमधील नागौर येथे पोहोचली त्यानंतर तिने तिच्यासोबत लग्न करण्याची मागणी केली आणि गोंधळ सुरू केला याच दरम्यान शारीरिक संबंधासाठी देखील तिला ती लोकांसमोर आग्रह करत होती.

धक्कादायक बाब म्हणजे पुढे जाऊन या महिलेने दहा लाख रुपयांची मागणी केली आणि जर माझी मागणी मान्य केली नाही तर आपल्या दोघांमध्ये झालेले खाजगी चॅटिंग सोशल मीडियावर व्हायरल करून देईल अशी देखील धमकी दिली असे पोलिस अधीक्षक राममूर्ती जोशी यांनी सांगितलेले आहे. पीडित महिलेने आणि तिच्या कुटुंबीयांनी रविवारी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.


शेअर करा