जेवणासाठी बायको कारबाहेरून आवाज देत होती अन पती चक्क..

शेअर करा

महाराष्ट्रात कौटुंबिक हिंसाचाराचे एक अजब प्रकरण मुंबईतील मीरा रोड इथे समोर आलेले असून एका चारचाकी गाडीत पतीसोबत चक्क चुलत ननंद दारू पीत असल्याचे दिसताच तिच्या आईकडे तक्रार करण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण करण्यात आलेली आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, रिंकी उपाध्याय ( वय 30 ) असे तक्रारदार महिला यांचे नाव असून त्यांचे पती संतोष यांना त्या जेवणास बोलवण्यासाठी गेलेल्या होत्या त्यावेळी गाडीमध्ये त्यांची चुलत ननंद देवकी उर्फ पिंकी ही संतोष उपाध्याय याच्यासोबत दारू पीत बसलेली होती त्या संदर्भात रिंकी यांनी जबाब विचारला मात्र तिने काहीही उत्तर दिले नाही.

रिंकी यांनी त्यानंतर तिची आई असलेली शिसमती यांच्याकडे धाव घेतली त्यावेळी तुमची मुलगी माझ्या पतीसोबत दारू पीत आहे असे सांगितले त्यावर तिच्या आईने माझी मुलगी तशी नाही असे प्रत्युत्तर दिले. तिची आई, मोठा मुलगा गौरवची वहिनी तृप्ती यांनी तक्रारदार यांनाच मारहाण करण्यास सुरू केली. पिंकी हिचा लहान भाऊ प्रकाश याने रिंकी यांच्या डोक्यात दगड मारला त्यात त्या जखमी झालेल्या आहे. 13 तारखेला याप्रकरणी काशिमिरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे


शेअर करा